HW News Marathi
महाराष्ट्र

गृहखाते हे माझे आवडते खाते – पंकजा मुंडे

 

माजलगाव – ज्या वेळेस माझे वडील गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे राज्याचे गृह खाते होते, त्या वेळेस गृह खात्याद्वारे गुन्हेगारी जगत मुळापासून उपटून काढण्याचे काम माझे वडील स्व. मुंडे यांनी केले, ते मी जवळून पाहिले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्यावर आपला हक्क असल्याची सुप्त इच्छा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी माजलगाव येथे रविवारी व्यक्त केली.

माजलगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, माजलगाव ग्रामीण पोलिस ठाणे कार्यालय अधिकारी-कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, गृह खाते हे माझे आवडते खाते आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना मुंबईतील गुन्हेगारांची असलेली दहशत नेस्तनाबूत करण्याचे काम केले. हे मी अत्यंत जवळून पाहिलेले असल्याने गृह खात्यावर माझे विशेष लक्ष आहे. परंतु ते खाते माझ्याकडे नसले तरी ते माझे आवडते आहे. मी कायम पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार अंबाजोगाई येथील अधिकारी कार्यालय वसाहतीचे गेल्या दहा वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण केले आहे. आता माजलगावातील कामाची पायाभरणी करून त्याचे उद््घाटन केलेले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना मिळालेली निवासस्थाने ही त्यांच्या परिवाराला सामावून घेण्यात कमी पडत आहेत. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे त्या म्हणाल्या.

निवासस्थानातील खोल्यांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिस वसाहतीत व्यायाम शाळा, प्रशस्त बगिचे उभारणीसाठी आपण आग्रही असून त्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळ्यांनी फिल्डवर जायची गरज नसते, शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

News Desk

‘आम्ही तुमचे बाप आहोत’ चंद्रकांत पाटील अजित पवारांना असे का म्हणाले ?

News Desk

अमोल कोल्हेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’

News Desk