HW News Marathi
महाराष्ट्र

अमोल कोल्हेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’

मुंबई | लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याने राज्यात पुन्हा पक्षाला बळकट करण्याचे आव्हान सध्या राष्ट्रवादी पुढे आहेत. याच पार्श्वभूमीवर आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे आता ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. विधानसभेच्या प्रचारात अमोल कोल्हे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांच्या बरोबरीने काम करतील असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, येत्या ६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीच्या या ‘शिवस्वराज्य यात्रे’ला सुरुवात होईल. अमोल कोल्हे हे या शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व करतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सतीश उकेंना घेऊन ईडीचे पथक मुंबईत दाखल

News Desk

हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती

Aprna

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ३ जणांची निर्घृण हत्या

News Desk