HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकार घोटाळेबाज मुश्रीफांना पुन्हा वाचवणार का ? कोल्हापूर दौऱ्यावरुन सोमय्यांचे आव्हान

मुंबई। भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा कोल्हापूर दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी साताऱ्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याला देखील भेट देणार असल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात २ घोटाळे बाहेर काढले आहेत. या घोटाळ्यातील साखर कारखाना आणि पोलिसांत तक्रार देण्यासाठी किरीट सोमय्या २० सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौरा करणार होते परंतु त्यांच्या दौऱ्यावर निर्बंध लावण्यात आले होते. परंतु आता पुन्हा कोल्हापूर दौरा करणार असून राज्य सरकार घोटाळेबाज हसन मुश्रीफ यांना वाचवणार का? जनतेच्या आवाजाला साथ देणार असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

पारनेर साखर कारखाना बचाव समिती यांच्या विनंतीला मान देऊन पारनेरला जाणार

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापूर दौरा करणार असल्याची माहिती दिली आहे. सोमय्या यांनी सांगितले की, पारनेर साखर कारखाना बचाव समिती यांच्या विनंतीला मान देऊन पारनेरला जाणार आहे. २२ हजार शेतकऱ्यांची लूटपाट करण्यात आली. त्यांनी आपल्या आयुष्याचे स्वप्न पाहिले होते. ते कशापद्धतीने काही व्यक्तिंनी तो काखाना कसा गिळंकृत करुन घेतला याबाबत माहिती घेण्यासाठी दुपारी १२.३० पारनेरला जाणार आहे. यावेळी कारखाना बचाव समिती, शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. २६ तारखेला रविवारी अलिबागला जाणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

जरंडेश्वर कारखान्याची आणि तिथल्या शेतकऱ्यांची भेट घेणार

२८ सप्टेंबरला अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहे. हे ठाकरे सरकारला कळवले आहे. पाहूया ठाकरे सरकार पुन्हा एकदा घोटाळेबाज हसन मुश्रीफला वाचवण्यासाठी थांबवण्याचे अंबाबाईचे दर्शन होणार नाही असा प्रयत्न करत आहे. की महाराष्ट्राच्या जनतेमध्ये हसन मुश्रीफ आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जो आवाज आज क्रांती पैदा झाले त्याला दाद देते. कोल्हापूर पासून साताऱ्याला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याची आणि तिथल्या शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांची लायकी ५५ लाखांची

मला एक गोष्ट नमूद करायची आहे. संजय राऊत म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सव्वा रुपयांचे मूल्यांकन केलं. त्या अहंकारात संजय राऊत म्हणतात पाटील यांची लायकी फक्त सव्वा रुपये आहे. संजय राऊत तुमच्या ठाकरे सरकारमधील नेते दर आठवड्याला किरीट सोमय्याला १०० कोटींची नोटीस पाठवत असतात. प्रताप सरनाईक, उद्धव ठाकरेंचे पार्टनर रविंद्र वायकर, त्यांचा उजवा हात अनिल परब असो की, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे लाडके हसन मुश्रीफ यांनी तर पहिले १०० कोटी दुसरी ५० कोटी आता पुढच्या आठवड्यात तिसरा घोटाळा काढणार म्हणजे आणखी १०० कोटी तर ५५ च्या नोटीस दिल्या आहेत तर किरीट सोमय्याचे मूल्यांकन तुम्ही ५५० कोटी करतात. संजय राऊत तुमची लायकी तर ५५ लाखांची आहे. ५५ लाख पीएमसी बँकेच्या डीपॉझिटरच्या तुम्हीच चोरल्या होत्या, तुम्ही काय आमचे मुल्यांकन करणार असे प्रत्युत्तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वत:च्या मुलाला मंत्री केलं,आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय? भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

१४ एप्रिल रोजी होणार रोकडरहित (कॅशलेस) व्यवहार जनजागृती कार्यक्रम

News Desk

NEET परीक्षेचा आज निकाल, जाणून घ्या कुठे पाहाल..

News Desk