HW News Marathi
महाराष्ट्र

डिजीधन मेळाव्यातील लोकराज्यच्या दालनास खोतकर यांनी भेट दिली

उत्तम बाबळे

नांदेड :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेत आज डिजीधन मेळावा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात या मेळावा आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रदर्शनात नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन दालनही उभारण्यात आले. या दालनास राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आवर्जून भेट दिली व लोकराज्य विषयी प्रशंसा केली.

पालकमंत्री खोतकर यांच्या समवेत आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदींचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी मान्यवरांना लोकराज्यचा अंक व पुष्प देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, छायाचित्रकार विजय होकर्णे, लिपीक अलका पाटील, काशिनाथ आरेवार, युसूफ पठाण, प्रवीण बिदरकर, बाल नरसय्या अंगली यांनी प्रदर्शन दालनासाठी संयोजन केले.

या दालनात लोकराज्यचे विविध अंक, विशेषांक प्रदर्शीत करण्यात आले. तसेच लोकराज्य वार्षिक वर्गणीची नोंदणी व अंकविक्रीही करण्यात आली. लोकराज्यविषयीच्या दृक-श्राव्य जिंगल्सचेही प्रसारणही करण्यात आले. यामुळे दालन आकर्षणाचे केंद्र ठरले. त्यामुळे लोकराज्यच्या या दालनास दिवसभरात अनेकांनी भेट देऊन लोकराज्यविषयी माहिती घेतली. तत्पुर्वी सकाळच्या सत्रात मेळाव्यात सहभागी विविध घटकांच्या दालनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, एनआयसीचे जिल्हा माहिती अधिकारी सुनिल पोटेकर आदींची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी काकाणी यांनी प्रदर्शनातील सर्वच दालनांना भेट देऊन, तेथील डिजीटल व्यवहार, विविध प्रकारची उत्पादने, उपक्रम आदींची माहिती घेतली. दिवसभरात विद्यार्थी, तरूण, शेतकरी, व्यापारी, व्यावसायीक आदींनी दालनांना भेट देऊन माहिती घेतली. प्रदर्शनातील दिवसभराच्या घडामोडींबाबत नियंत्रण कक्षातून राजेश कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडून दाखवावे – धनंजय मुंडे

News Desk

झारखंड सरकार पाडण्यात आपला हात नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

News Desk

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाघाला दत्तक घेतले

News Desk