HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडून दाखवावे – धनंजय मुंडे

 

सय्यद जमील

परभणी – निवडणूकीपूर्वी विभक्त व्हायचे आणि निवडणूकीनंतर पुन्हा एकत्र यायचे धंदे बंद करा. शिवसेना प्रमुखांप्रमाणे बाणा दाखवून सत्तेतून बाहेर पडून दाखवा असे आव्हान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला दिले.

३ फेब्रुवारी रोजी होणा-या शिक्षक आमदार निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . शहरातील शिवाजी महाविद्यालयात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी खासदार गणेशराव दुधगावकर हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार बाबाजानी दुर्रानी , सुरेश वरपुडकर , सुरेश देशमुख , रामराव वडकुते आदींची उपस्थिती होती

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत भाजपसोबत युती तोडण्याचे जाहीर केल्यावर हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बाणा दाखवल्या प्रमाणे सत्तेबाहेर पडून दाखवा , तुम्ही २५ वर्ष भाजप सोबत सडलात , निवडणुकीच्या पूर्वी वेगळे व्हायचे आणि निवडणुकीनंतर सत्तेसाठी एकत्र यायचे हा धंदा आता बंद करा आसा सल्ला धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला दिला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

News Desk

अन्वय नाईक यांची ‘ती’ सुसाईड नोट आली समोर

News Desk

विधानपरिषद उपसभापतींसह मंत्र्यांची पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात बैठक

Aprna