HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीवर दगडफेक करुन दंगल प्रकरणी  ६० जणा विरुद्ध गुन्हा दाखल

उत्तम बाबळे नांदेड :- भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने १४ एप्रिल रोजी पुर्णा शहरात निघालेल्या मिरवणूकीवर अचानकपणे प्रचंड दगडफेक करण्यात आली होती.यात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले व एकाचा मृत्यू देखील झाला आणि मोठे नूकसान झाले.या प्रकरणी काही भिमसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.तर सार्वजनिक भिम व बुध्द जयंती मंडळ अध्यक्ष भिक्खु बोधीधम्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ६० जणाविरुद्ध डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जाळणे,महिलांचा विनयभंग करणे,अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करणे,दागीने लुटने यासह अनुसूचित जाती व जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुर्णा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुर्णा शहरात १४ एप्रिल २०१७ रोजी भिम व बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्य भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.ही मिरवणूक रात्री ७:३० वाजताच्या दरम्यान शहरातील कदम (मराठ)गल्ली मध्ये आली असता तेथील महादेव मंदीर व एका घराच्या छतावरुन अचानकपणे मिरवणूकीवर प्रचंड दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीत अनेक जण गंभीररित्या जखमी झाले व एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू पण झाला. प्रताप कदम,नरेश कदम यांसह एक मोठा जमाव दगडफेक करत मिरवणुकीतील सहभागी लोकांत घुसला व त्यांनी महिला मुलींचे कपडे फाडले,अश्लील वजातीवाचक शिवीगाळ करत त्या महिलांसह पुरुष व बालकांनाही मारहाण केली,प्रतिकार केला असता जीवे मारण्याची धमकी देत महिलांच्या अंगावरील दागीणे लुटले.तसेच त्या जमावाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी दलित समाजाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करत मिरवणूकीतील ज्या ट्रॅक्टरवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवलेली होती त्या ट्रक्टरसह डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर राॅकेल ओतून पेटवून दिले,जाळले.अशा आशयाची फिर्याद भिम व बुध्द सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष भिक्खु बोधीधम्मा,रा.पुर्णा यांनी दिल्यावरुन त्या ५० ते ६० संबंधीत आरोपींविरुद्ध कलम १४३,१४७,१४८,१४९,२९५,३५४,३३७,४३५,भादवी सह अनुसुचीत जाती व जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायदा अधिनिय १९८९ कलम ३(१),(५),३(आर) (५) (टी) प्रमाणे गुन्हें दाखल करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ए.जी.खान हे करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडीडी रहिवाशांना स्टॅम्प ड्यूटी फक्त आता 1 हजार रुपये राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

News Desk

‘तो’ मायचा पूत अजून जन्माला आला नाहीय!; उद्धव ठाकरेंचा इशारा

News Desk

राज्यातील १२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार !

News Desk