HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ.हंसराज वैद्य यांना फेस्कॉमचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रदान 

उत्तम बाबळे

नांदेड :- महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) चे दि.२९ व ३० एप्रिल २०१ रोजी धुळे येथे राज्यव्यापी अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष द.तु.चौधरी अध्यक्ष फेस्कॉम हे होते तर विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष एन.डी.चापके, या सोहळ्याचे उद्घाटक जयकुमार रावल, रोजगार हमी योजना व पर्यटन विकासमंत्री हे होते. स्वागताध्यक्ष आ.राजवर्धन कदमबांडे हे होते. या अधिवेशनात ज्येष्ठांच्या सामाजीक चळवळीत उत्कृष्ट कार्य करणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फेस्कॉम उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागातर्फे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातून उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता म्हणून डॉ.हंसराज वैद्य यांच्या नावाची शिफारस व या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात येऊन दि.30 एप्रिल रोजी धुळे येथील राज्यस्तरीय अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपात्र देवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. त्याबाबत फेस्कॉमचे अध्यक्ष द.तु.चौधरी, विभागीय अध्यक्ष डी.के.पाटील, फेस्कॉमचे उपाध्यक्ष ना.ना.इंगळे, अन्नासाहेब टेकाळे, मुख्य सचिव अरूण रोडे, पुन्याचे बेडकीहाळ, नांदेडचे सुभाष बार्‍हाळे, अशोक तेरकर, गोपाळराव बंगाळे, माधवराव पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला.

त्याबाबत उपरोक्त सर्वांनी तसेच खानदेशचे अध्यक्ष व संयोजन समितीचे अध्यक्ष भदाणे, सचिव बी.एन.पाटील तसेच बी.टी.कन्नावार, कदम रूईकर व इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, असे डि.के.पाटील विभागीय अध्यक्ष यांनी कळविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू’, निलेश राणेंची राऊतांवर गंभीर टीका  

News Desk

मी मुख्यमंत्री नाही, यावर विश्वास बसायला मला दोन दिवस लागले !

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला होणार सुरुवात

News Desk