HW News Marathi
महाराष्ट्र

दुकानातील चोरी सीसीटिव्हीत कैद

एसीपी कार्यालयाजवळच घडली घटना

चोरटयांचे पोलिसांना खुले आव्हान, घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद !

उल्हासनगर- ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. मात्र, या बंदोबस्ताला न जुमानता चोरटयांनी एसीपी कार्यालयाजवळील तीन दुकाने फोडून चोरी केली, आणि थेट पोलिस यंत्रणेपुढे आव्हान उभं केलं. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे .

उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. चोरटयांनी पहाटे शहरातील पवई चौकातील तब्बल तीन दुकानांची शटर तोडून दुकानातील मुद्देमाल लंपास केला, विशेष म्हणजे हि चोरी झाली त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर उल्हसनगरच्या सहायक पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे, या कार्यालयात रात्रभर पोलीस गाडया आणि पोलिसांची वर्दळ सुरु असते.

चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्याआधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.

या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज पहा…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार

Aprna

“बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले ,एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले” – मुख्यमंत्री

News Desk

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि शरद पवारांच्या उपस्थित’ मुंबईकरांचे स्वप्न होणार पूर्ण!

News Desk