HW News Marathi
महाराष्ट्र

दहशतवादी हल्ल्यात दोन गोळ्या लागूनही छाया मेहर सुखरूप, सर जेजेमध्ये शस्त्रक्रिया

जम्मू काश्मीर -अमरनाथ येथे दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या डहाणूच्या रहिवाशी छाया मेहर यांच्यावर मुंबईतील जेजे रूणालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात छाया यांना दोन गोळ्या लागल्या होत्या.. एक गोळी पोटात तर दुसरी गोळी हाताला लागली होती. ही गोळी मुंबईच्या जेजे रूग्णालयात शस्त्रक्रिया करून काढण्यात आले.

अमरनाथ येथे दहशतवाद्यानी बसवर हल्ला केला होता यात छाया यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. छाया यांना जखमी अवस्थेत अमरनाथ येथून मुंबईला हलवण्यात आले त्यानंतर गुरूवारी त्यांच्यावर जेजे रूग्णालयात शस्त्रक्रीया करून गोळ्या कढण्यात आले.

सर. जे.जे. रुग्णालयाच्या ऑर्थोपेडीक विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांनी मेहेर यांच्यावर शस्त्रक्रिया केली. मेहेर यांच्या उजव्या हातात अडकलेली गोळी काढून टाकलीये. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं, त्यावर आम्ही उपचार केलेत. येत्या दोन-तीन आठवड्यात त्यांची जखम भरून निघेल. अशी माहिती डॉ. पवार यांनी माय मेडिकल मंत्राला दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निर्बंध लावण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान

News Desk

मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आम्ही मातोश्रीवर जाणं बंद केलं नाही!

News Desk

वरळी नायगाव येथील बीडीडी चाळींचे नामकरण

Aprna
क्राइम

शिवरायां’नी शोधून दिले स्त्रीलंपट आरोपी

News Desk

मुंबई : मायबहिणींच्या अब्रुचे रक्षण करण्याचे व्रत शिवछत्रपतींनी समाधीस्थ झाल्यानंतर तीन – साडेतीनशे वर्षांनंतरही अखंड सुरू ठेवले आहे. मुंबईत तरुणीची छेड काढून पळालेल्या रोडरोमिओंच्या मुसक्या आवळण्यात शिवछत्रपतींनी पोलिसांना सहकार्य केले आहे.

त्याचे झाले असे की, वांद्रे परिसरात राहणारी १७ वर्षीय तरुणी ज्ञानेश्वर नगर येथे रस्त्यातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या उमेश चव्हाण (२४) आणि सुनील राठोड (१९) यांनी भररस्त्यात तिचा छेड काढला. तरुणीने खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासले. आरोपी उभे असलेल्या ठिकाणी कुरिअर कंपनीचे ऑफिस असून कंपनीतील दोघांशी ते बोलत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले. पोलिसांनी कुरिअर कंपनीतील आठ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली, मात्र काहीच हाती लागले नाही. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोघांच्या दुचाकीवरील नंबरप्लेटशेजारी रेडियममध्ये शिवाजी महाराजांचे चित्र स्पष्ट दिसत होते. त्याआधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोहन कदम यांच्या पथकाने एका आरोपीला वांद्रेतून तर दुसऱ्याला वाकोल्यातून शिताफीने अटक केली. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी तब्बल ४० जणांची कसून चौकशी केली होती.

Related posts

लहान मुलांच्या वादात मोठ्यांची हाणामारी

News Desk

धर्माबादमध्ये दगडाने ठेचून हत्या करणा-याला 24 तासात अटक

News Desk

पार्टीत NCP नेत्याच्या जवळचा माणूस, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा

News Desk