HW News Marathi
Uncategorized

थिएटरमध्ये प्रिया बेर्डे यांचा विनयभंग

मुंबईः मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा थिएटरमध्येच विनयभंग झाल्याची घटना उघड झाली. मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला. मद्यपान केलेल्या एकाने त्यांचा विनयभंग केल्याचे बेर्डे यांनी माध्यमांना सांगितले. या वेळी प्रिया बेर्डे आपल्या मुलीसह थिएटरमध्ये होत्या. सुरक्षरक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी बोरीवलीतील एका व्यावसायिकालाशनिवारी अटक करण्यात आली आहे. सुनील जीना असे त्याचे नाव आहे. प्रिया बेर्डे यांच्या तक्रारीनुसार, “आरोपी आणि त्याच्यासोबत असलेले तीन जण मद्यधुंद अवस्थेत होते. संध्याकाळी 5.30 वाजताचा शो सुरु झाल्यानंतर आरोपींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर थिएटरमधील इतर प्रेक्षकांनी त्यांना मज्जाव केला असता ते तिघेही थिएटरमधून बाहेर गेले.

पण काही मिनिटांनी कोणीतरी आपल्या कमरेला स्पर्श करत असल्याचं जाणवलं. गोंधळ घालणारा व्यक्तीच हे कृत्य करत असल्याचं लक्षात आल्यानंतर मी त्याच्या थोबाडीत लगावली आणि आरडाओरडा केला. तो दारुच्या नशेत होता. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मला धक्का देऊन त्याने पळ काढला. या सगळ्या प्रकारामुळे माझ्या मुलीला धक्का बसला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात गळीत हंगामाला सुरुवात, दीडशे कारखान्यांना परवाना

News Desk

शिवसेनेच्या बैठकीचं पत्र सरन्यायाधीश Dhananjay Chandrachud यांनी मराठीतून वाचून दाखवलं

News Desk

पत्राचाळ प्रकरणात मोहित कंबोज यांच्यावर सुनील राऊतांचा गंभीर आरोप

News Desk