HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात ६९.६१ टक्के मतदान

१२ टेबलवर होणार प्रत्येकी गट व गणांची मतमोजणी

उत्तम बाबळे :नांदेड : – नांदेड जिल्ह्यातील एकूण १६ लाख ९४ हजार ७०५ मतदारांपैकी ११ लाख ७९ हजार ७३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून त्यांची टक्केवारी ६९.६१ इतकी आहे. यात ८ लाख ९० हजार ३२३ पुरुष मतदारांपैकी ६ लाख २४ हजार ९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांची टक्केवारी ७०.१० टक्के आहे. तर ८ लाख ४ हजार ३७२ महिला मतदारांपैकी ५ लाख ५५ हजार ६६७ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांची टक्केवारी ६९.०८ इतकी आहे. अन्य म्हणून ( तृतीयपंथी ) नोंदणी केलेल्या १० मतदारांपैकी एकाचेही मतदान यावेळी झाले नाही.

झालेल्या मतदानात सर्वाधिक टक्केवारी माहूर तालुक्याची ( ७७.१० टक्के ) तर सर्वात कमी टक्केवारी मुखेड तालुक्याची ( ६२.८८ टक्के ) आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या ६३ गटांसाठी ३७४ तर पंचायत समितीच्या १२६ गणांसाठी ६०३ उमेदवारांनी निवडणुक लढविली आहे. मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या १६ लाख ९४ हजार ७०५ इतकी आहे. त्यामध्ये ८ लाख ९० हजार ३२३ पुरूष मतदार आणि ८ लाख ४ हजार ३७२ महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच दहा मतदारांची इतर म्हणुन ( तृतीयपंथी ) नोंदणी केलेली आहे.त्यापैकी एकानेही मतदान केले नसल्याने जनजागृती अभियान यांच्यासाठी व्यर्थ ठरले आहे.२३ फेब्रुवारी २०१७ रोजी नांदेड जिल्ह्यातील १६ तालुकास्थानी मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे.सर्व ठिकाणी मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण २२ फेब्रवारी रोजी घेण्यात आले आहे.प्रशासनाने केलेली तयारी व मतमोजणी प्रक्रिया उदा.पुढील प्रमाणे…

भोकर तालुक्यातील ३ गट व ६ गणांसाठी (एकूण मतदार 76 हजार 226 )- 70.15 टक्के मतदान झाले. ( पुरुष- 70.71 टक्के, महिला-69.56 टक्के), भोकर तालुका निवडणुक निरीक्षक जगदिश मणीयार व निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साै.दीपाली मोतीयेळे आणि सहाय्यक नि.नि.अ.तहसिलदार व्यंकटेश मुंडे,गटविकास अधिकारी जी.डी.गोरे यांच्या उपस्थितीत मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यक यांचे द्वितीय प्रशिक्षण घेण्यात आले.प्राप्त माहिती नुसार भोकर तालुक्यातील ३ गट व ६ गणांच्या मतमोजणीसाठी १२ टेबल आणि १८ फे-यांत मतमोजणी होणार असून याच टेबल मधील पहिल्या टेबलवर टपाली मतमोजणी देखील होईल.प्रत्येक टेबलवर १ पर्यवेक्षक अधिकारी व २ सहाय्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सर्व प्रथम २५ पाळज गटाची आणि याच गटाती पाळज,देवठाणा अशा २ गणांची मतमोजणी करण्यात येणार आहे.याच प्रमाणे दुसरी फेरी २६ भोसी गट व भोसी ,रिठ्ठा गण ,तिसरी फेरी २७ पिंपळढव गट व या गटातील पिंपळढव,हाळदा गणांची मोजणी होईल.भोकर तहसिल कार्यालयाच्या तळमजल्यात ही मतमोजणी सकाळी १० वाजता सुरु करण्यात येणार असून तहसिल समोरील मुख्य रस्त्यावरील वाहतुक मतमोजणी काळात बंद करुन ती वळण रस्त्याने वळवली आहे.वाहतुक वळविण्यासाठी व अनुचित प्रकारावर आळा घालण्यासाठी पो.नि.संदिपान शेळके यांनी मोठ्या ताफ्यासह चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे.मतमोजणी यशस्वीततेसाठी ना.त.एम.एस.जगताप,डी.एच.दंताळे,पी.एन.रुषी,महेश वाकडे आदी जण सहकार्य करत आहेत.अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी साै.दीपाली मोतीयेळे यांनी दिली असून याच माहीती प्रमाणे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुकास्थानी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल – नारायण राणे

News Desk

विभागात १.३५ लाख हेक्टरवर नुकसान, शासन शेतकर्‍यांच्या खंबीरपणे पाठिशी! – उपमुख्यमंत्री

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ७ वाजता कोणती मोठी घोषणा करणार ?जनतेशी साधणार संवाद

News Desk