HW News Marathi
Covid-19

पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात ५१.५% लोकांना होऊन गेला कोरोना

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. पुण्याच्या आयसर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या सेरॉलॉगिकल सर्व्हेतून अशी माहिती समोर आली आहे कि, “पुण्यात कोरोना हॉटस्पॉट्स परिसरातील सुमारे ५१.५% लोकांना कोरोना होऊन गेला आहे.” पुण्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉट्स परिसरात हा सर्व्हे करण्यात आला. यादरम्यान, एकूण १ हजार ६६४ रक्त चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी एकूण ५१.५ % जणांच्या शरीरात अँटिबॉडीज आढळून आल्या असून त्यांना कोरोना होऊन गेल्याची बाब समोर आली आहे.

पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, ‘आयसर’चे संचालक प्रो. शशिधर यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आहे. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, येरवडामध्ये ३६७ जणांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. त्यापैकी५६.६ टक्के जणांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या. तर कसबा येथील सोमवार पेठ ३५२ पैकी ३६.१ टक्के, रास्ता पेठ येथील रविवार पेठमध्ये ३३५ पैकी ४५.७ टक्के, लोहियानागर येथील कासेवाडीमध्ये ३१२ पैकी ६५.७ टक्के, नवी पेठ येथील पर्वतीत २९८ पैकी ५६.७ टक्के जणांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या. एकूण १६६४ सॅम्पलपैकी ५१.५ टक्के लोकांना यापूर्वीच कोरोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ५७,९८२ नवे कोरोना रुग्ण तर ९४१ रुग्णांचा झाला मृत्यू

swarit

राज्यात आज ११,५१४ नवे रुग्ण तर १०,८५४ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ८३,८०९ नवे रुग्ण आढळले

News Desk