HW News Marathi
Covid-19

लवकरात लवकर वाहतूक चालू करा नाही तर पुन्हा आंदोलन करू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

लवकरात लवकर वाहतूक चालू करा नाही तर पुन्हा आंदोलन करू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

मुंबई | राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करावी तसेच मंदिरे खुली करण्यासाठी सर्व साधुसंतांना पाठिंबा देण्यात येईल, अशी माहिती अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी  दिली आहे. मुंबईतील आंबेडकर भवनात आज (१७ ऑगस्ट) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “एसटी महामंडळ व बेस्ट कर्मचाऱ्यांची एक बैठक आज घेण्यात आली होती. बेस्ट १०० टक्के सुरू आहे, ही बातमी खोटी आहे. ज्या लहान बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्या पूर्ण चालू आहेत. तर बेस्ट मालकीच्या केवळ १५ टक्के बस चालू आहेत. काँट्रॅक्टदाराच्या बस चालू असल्यामुळे बेस्टचा तोटा होत आहे. याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

“वंचित बहुजन आघाडी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही एक दिवस गाड्या बाहेर काढण्यासाठी हजर रहा. गाड्या जास्त दिवस आतमध्ये बंद राहिल्या की खराब होतात. राज्यात आंतरराज्य जिल्हा बंदी आहे. ही जिल्हाबंदी हटवावी आणि नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी. मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की माझे निर्देश घटनेसारखे वाटत असेल तर त्याचे पालन करावे. लोकांचे दळणवळण चालू व्हावे. त्याबाबत घोषणा करण्यात यावी”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

तसेच, “दिल्लीत केवळ मेट्रो बंद आहेत,मात्र इतर सर्व वाहतूक सुरू आहे तर उत्तर प्रदेश मध्येही वाहतूक सेवा चालू आहेत. मग या बाबतीत महाराष्ट्र मागासलेला दाखवू नये”, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केली आहे. लवकरात लवकर वाहतूक चालू करा नाही तर पुन्हा आम्ही आंदोलन करु असा सूचक इशाराही यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. याआधीही त्यांनी परिवहन सेवा सुरू करण्यासाठी डफली आंदोलन राज्यभर केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शहा यांची बैठक

News Desk

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

News Desk

बारामतीत आज कोरोनाचा दुसरा बळी

News Desk