HW News Marathi
महाराष्ट्र

पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात फक्त एक रूपयांची वाढ

  • प्रति पेपर तपासणीस मिळणार 1 रूपयांची वाढ

पी. रामदास

मुंबई – राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावी बोर्डाच्या पेपर तपासनीस व पर्यवेक्षक यांच्या पेपर तपासण्याच्या मानधनात प्रतिपेपर केवळ एक रुपयाने केल्याचे जेव्हा उघड झाले, तेव्हा मात्र राज्यातील शिक्षक मंडळींनी संताप व्यक्त केला. राज्य शिक्षण मंडळाने आपली थट्टा केली असल्याची भावना या शिक्षकांत निर्माण झाली आहे.

अनेक वर्षांपासून बोर्डाच्या पेपर तपासनीस व पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ झाली नव्हती. शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून मानधन वाढीसंदर्भात वारंवार मागणी करण्यात येत होती. अखेर ३१ मार्च रोजी राज्य मंडळाने मानधन वाढीचे परिपत्रक काढले. मात्र त्यात नाममात्र १ रुपया प्रतिपेपर अशी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने दहावी व बारावी पेपर तपासणाऱ्या परीक्षक व पर्यवेक्षकांत असंतोष आहे.

सरकारकडून शिक्षकांची चेष्टा :गिरमकर : सन २००९ मध्ये बारावीचे पेपर तपासण्यासाठी असणारे ३ रुपये मानधन ५ रुपये करण्यात आले. या वेळी बोर्डाने विद्यार्थ्यांकडून ७५ रुपये वाढीव परीक्षा शुल्क घेतले आहे. त्यामुळे परीक्षक व नियामक व पर्यवेक्षक यांचे मानधनही त्यात तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट होईल असे अपेक्षित होते. पण आता तुटपुंजी मानधन वाढ करून राज्य मंडळाने राज्यातील शिक्षकांची चेष्टा केल्याचे मत शिक्षक भारतीच्या प्रा. शरद गिरमकर यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होण्याची शक्यता

News Desk

“महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे ? की एका बबड्याच्या फायद्याचं?”

News Desk

नाशिकच्या कांद्या व्यापाऱ्यावर आयकर विभागाचे छापे, कांद्याचे दर पन्नास टक्क्यांनी घसरले

News Desk