पनवेल महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे राज्यातील अनेक प्रमुख नेते पनवेलमध्ये आले. शनिवारी प्रितम मुंडे यांनी ‘रोड शो‘ ने जोरदार प्रचार करीत विरोधकांच्या उरात धडकी निर्माण केली. या रोड शो’ला भाजपच्या कामोठ्यातील मुख्य कार्यालयातून सुरूवात झाली. यामध्ये रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत यांच्यासह उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वसाहतीमधील प्रमुख चौकांत त्यांना पाहण्यासाठी रहिवाशांनी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्याच्या स्वागतासाठी मुळच्या मराठवाड्यातील रहिवाशांची अधिक गर्दी होती. त्यांच्या या रोडशोमध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांचा समावेश होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.