HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस उप निरिक्षक परीक्षेत नागनाथ तुकडे आणि अजय लोहेकर उतीर्ण

उत्तम बाबळे

नांदेड :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या विभागीय पोलीस उप निरिक्षक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत भोकर पोलीस ठाण्यात सेवारत असलेले पो.काॅ. नागनाथ तुकडे यांनी नांदेड जिल्ह्यात खुल्या वर्गातून द्वितीय तर पो.कॉ. अजय यादवराव लोहेकर यांनी राखीव संवर्गातून २६ व्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन घलघवीत यश संपादन केले असून या यशाबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

भोकर पोलीस ठाण्यात सेवारत असलेले पो.काॅ.नागनाथ हनमंतगोंडा तुकडे हे सन २००६ मध्ये नांदेड पोलीस दलात दाखल झाले.कठोर सेवा बजावित आपली जिद्द व अभ्यासूवृत्तीच्या बळावर पोलीस दलात वरीष्ठ पदावर जाण्याचा मानस करुन त्यांनी सातत्त्याने अभ्यासाकडे लक्ष दिले.इतर मागास प्रवर्गातील असतांना देखील त्यांनी २०१६ ची त्या प्रवर्गातून परिक्षा देण्या एैवजी खुल्या वर्गातून उपरोक्त परिक्षा दिली.हे एक आव्हानात्मक असतांना देखील न खचता परिक्षा दिली व यात नांदेड जिल्ह्यातून दुस-या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन यश मिळविले.तसेच लोहा तालुक्याचे भूमिपूत्र असलेले अजय यादवराव लोहेकर हे २६ सप्टेंबर २००७ साली नांदेड पोलीस दलात दाखल झाले.आपले कर्तव्य बजावत कठोर मेहनत व अभ्यासाच्या बळावर या विभागीय पोलीस उपनिरिक्षक परीक्षेत त्यांनीही यशाला गवसणी घातली आहे. सदरील परीक्षेव्दारे ८२८ जण पोलीस उप निरिक्षक पद परिक्षेत उत्तीर्ण झाले.त्यातील ११८ जण हे आरक्षीत संवर्गातून निवडण्यात आले. यात अजय लोहेकर यांनी २६ वे स्थान प्राप्त केले आहे. या दोघांनीही आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल, पत्नी व भाऊ-बहिण, गुरुजन व सहकारी मित्र यांना दिले आहे. आता तुकडे व लोहेकर हे पोलीस अधिकारी बनले असून त्यांच्या या यशाबद्दल भोकरचे अप्पर पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,उप विभागीय पोलीस अधिकारी डी.एम.वाळके, गृह पोलीस उप अधिक्षक श्रीधर नांदेडकर,पो.नि.संदिपान शेळके,सहा.पो.नि.भाले,पो.उप.नि.चव्हाण,शेख,संपादक उत्तम बाबळे,पत्रकार अरुण डोईफोडे,आरपीआय राठोड, डॉ. बालाजी पेनूरकर, सुधाकर कांबळे, भगवान कंधारे, माळी सर, प्रकाश मामुलवार,पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून भावी सेवाकार्याला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उर्मिला मातोंडकरांचे नाव मीडियात चर्चेत आहे आम्हाला याची काही कल्पना नाही –  अनिल परब

News Desk

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून दिलासा, घेतले महत्वाचे ‘हे’ निर्णय

News Desk

छत्तीसगढमधील नक्षलवादी हल्ल्यात भाजप आमदारासह ५ जवान शहीद

News Desk