HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादेत शिवसेनेचा महापौर

औरंगाबाद: महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नंदकुमार घोडेले ७७ मते मिळवून विजयी झाले. यापूर्वी नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी देखील महापौरपदी काम केले आहे. त्यांच्यानंतर दुसºयांदा घोडेले घराण्याच्या वाट्याला महापौर पद आले आहे. आज महापालिका सभागृहात महापौरपदासाठीची मतदान प्रकिया पार पडली. यात घोडेले यांनी ‘एमआयएम’चे अब्दुल नाईकवाडे यांचा पराभव केला.

अब्दुल नाईकवाडे यांना २५ मते मिळाली, तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला ११ मतांवर समाधान मानावे लागले. महापौरपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर घोडेले म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं प्रस्तावित स्मारक, शहरातील रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था, स्वच्छता या गोष्टी माझ्यासाठी प्राधान्याच्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अक्कलकोटमध्ये हनुमानाची ध्यानधारणा

News Desk

गिरीश महाजनांमुळे अण्णा हजारेंचे उपोषण स्थगित

swarit

राज्य सरकारने नीट बाजू मांडली असती तर ही वेळ आली नसती! – प्रीतम मुंडे

Aprna