HW News Marathi
महाराष्ट्र

बेजबाबदार नागरिकांमुळे शहरातील समस्या वाढल्या

 

 

 

 

 

 

 

मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर

उल्हासनगर आपले कर्तव्य बजावण्यात उल्हासनगर शहरातील नागरिक अपुरे पडत असल्यामुळेच शहराची ही दुरावस्था असल्याची संतप्त प्रतिक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे .

काल मनपा आयुक्त राजेंद निंबाळकर यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शहरातील अनेक गंभीर मुद्द्यांवर चर्चा केली . या बाबत सविस्तरपणे बोलतांना निंबाळकर म्हणाले की शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी मी सोशल मीडियासाठी माझा मोबाईल नंबर दिला . यात सुरवातीला काही प्रमाणात यश देखील मिळाले कारण काही वास्तविक तक्रारी माझ्यापर्यंत येत असे , मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात खोट्या तक्रारी येऊ लागल्या आहेत . वैयक्तिक स्वार्थासाठी तक्रारी केल्या जातात असे दिसून येते . महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केला , त्यासाठी मालमत्ता कर वसूल करण्यासाठी अनेक योजना राबविल्या ,सूट दिली , जनजागृती केली , नोटा बंदीच्या काळात जुन्या नोटा घेण्याची मोठ्या प्रमाणात मुभा देखील दिली , रात्री उशिरापर्यंत माझ्या कर्मचाऱ्यांनी कामे केली तरी नागरिकांनी फार अल्प प्रमाणात प्रतिसाद दिला . या कारणांमुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे . पाणी -पुरवठ्याच्या बाबतीत देखील तीच परिस्थिती आहे . नवीन पाईपलाईन आल्यात तरी नागरिक जुन्या पाईपलाईन तश्याच ठेवल्या आहेत , दोन्ही पाईपलाईन मधून लोक पाणी भरतात , काही ठिकाणी दिवसातून तीन -तीन वेळा पाणी येते तर काही ठिकाणी एकदा देखील पाणी येत नाही , ज्या ठिकाणी दिवसातून तीन वेळा पाणी येते अशी ठिकाणे आम्ही शोधून काढली आहेत आणि त्या ठिकाणी फक्त एकदाच पाणीपुरवठा केला जाईल . अशी वितरण व्यवस्था केल्यामुळे आम्ही प्रतिमाह ६५ लाख रुपयांची बचत केली आहे . हे पाऊल उचलल्यामुळे एम आय डी चे साधारणपणे ३ करोड रुपये येणारे बिल आता २ करोड ३५ लाखांपर्यंत आणले आहे शहरातील कचऱ्याची समस्या व तुंबलेले नाले यांना नागरिकच जबाबदार आहेत . केवळ झोपडपट्टीत असलेले लोकच रस्त्यावर कचरा फेकतात असे नाहीत तर चांगल्या वस्तीमधील लोक उंच इमारती मधून रस्त्यावर कचरा फेकत असल्याचे मी स्वतः अनेकदा बघीतले आहे . नाल्यामध्ये नागरिक कचरा फेकत असल्याच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत , त्यामुळे तुंबलेल्या नाल्यांना सुद्धा नागरिकच जबाबदार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले .अनधिकृत बांधकाम , पाणीचोरी , रस्त्यावर कचरा फेकणे , मालमत्ता कर न भरणे , अतिक्रमण अशी कोणती ना कोणती चुकीची कामे नागरिक करीतच असतात त्यामुळे अशा नागरिकांना तक्रार करण्याचा अधिकारच नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंविरोधात उत्तरप्रदेशमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल!

News Desk

‘शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात’, किशोरी पेडणेकरांचे राणेंवर टीकास्त्र!

News Desk

रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल

News Desk