HW News Marathi
महाराष्ट्र

बुडण्यापूर्वी त्यांनी केले फेसबूक लाइव्ह

नागपूर: वेणा जलाशयात बुडून आठ तरुणांना जलसमाधी मिळाली. परंतु बुडण्यापूर्वी या तरुणांनी आपल्या मित्रांशी फेसबूकवरून लाइव्ह संवाद साधला होता. यावेळी त्यांच्या काही मित्रांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. एवढेजण बोटीत कसे बसले आहात, असे विचारून पाण्यात बुडण्याची भीती व्यक्त केली होती. अखेर ही भीती खरी ठरली आणि आठ जणांचा बळी गेला. दरम्यान, अशा घटनांमुळे सोशल मीडियाचे वेड व काळजी हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

वेणा तलावात रविवारी बोट बुडून ११ तरूण बुडाले. त्यातील तीन तरूण पोहून किनारी आले. परंतु इतर आठ जणांचा बळी गेला. बोट बुडण्यापूर्वी पंकज डोईफोडे या तरुणाने फेसबूकवर ही मस्ती लाइव्ह दाखवली होती. या व्हिडिओमध्ये पंकज, तू आला नाहीस, आम्ही मिस केले असे त्याने म्हटले. ‘नजारा देख, नजारा’ असे म्हणत तो जलाशयातील पाणी फेसबुकवरील मित्रांना दाखवितो. यावेळी बोटीतील तरुणांची फेसबुकवरुन मित्रांशी संवाद साधताना धडपड सुरू असताना बोटीतील एक तरुण ‘हलू नका’ भीती वाटते, असे म्हणताना दिसतो. दुसºया तरुणाने ‘पाणी पाणी’ हे गाणे म्हणायला सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. पण याच पाण्याने तरुणांचा घात केला. दरम्यान, सोमवारी बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. काही जणांचे मृतदेह हाती आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वच्छ स्थानकासह प्रवाशांना पुष्पगुच्छ देत भोकर आगाराचा वर्धापन दिन उत्साहात

News Desk

“साधेपणानं कार्यक्रम कर असं सांगितलं होतं पण…”,अजितदादांनी टोचले आमदाराचे कान

News Desk

अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा!

News Desk