HW News Marathi
महाराष्ट्र

बीपीएल रेशनकार्ड धारकांची क्रुर चेष्टा, मिळणार फक्त अर्धा किलो साखर

मे महिन्यासाठी ४ हजार ५७५ क्विंटल साखर स्वस्तधान्य दुकानांतून वाटप होणार

उत्तम बाबळे

नांदेड दि.१८:- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील बीपीएल व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकासाठी शासनाने मे २०१७ साठी नियमित नियतन साखर प्रति व्‍यक्‍ती ५०० ग्रॅम प्रमाणे प्रौढ अथवा मूल, बालक असा भेदभाव न करता सरसकट मंजूर केले आहे. मे २०१७ या महिन्‍यात जिल्‍हयासाठी ४ हजार ५७५ क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले असून पुढील प्रमाणे तालुका निहाय नियतन देण्‍यात आले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत ती साखर वितरण करण्‍यात येणार आहे.

नांदेड व लोहा- ५३४,हदगाव- ३९९,किनवट- ५२७, भोकर- १७५,बिलोली-२८७,देगलूर- २५५, मुखेड- ४८७, कंधार- ३७४,लोहा- ३२३ अर्धापूर-१२८, हिमायतनगर-१९८, माहूर- १९४,उमरी- १३५, धर्माबाद- १५२,नायगाव- २६३, मुदखेड- १४४ क्विंटल असे आहे.प्रति व्यक्ती ५०० ग्रॅम साखर या प्रमाणे कुटूंबातील एकूण व्यक्तींची साखर सर्व बीपीएल, अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानातून उचल करावी , असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक!

News Desk

हल्ली महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्यं; अजित पवारांची पंतप्रधानांकडे तक्रार

Aprna

महाराष्ट्र भाजप महामंडळाने त्यांचा निधी राज्यात नव्हे तर केंद्रात वळवला, सामनातून टीका

News Desk