HW News Marathi
महाराष्ट्र

बहुमताविनाही भोकर पं.स. सभापतीपद काँग्रेसकडे उपसभापतीपदाची लॉटरी अपक्षाला?

उत्तम बाबळे

भोकर – सहा सदस्य असलेल्या भोकर पंचायत समितीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. पण मागास प्रवर्ग महिला राखीव या आरक्षण निकषात अन्य कुणीही निवडून आलेले नसल्यामुळे काँग्रेसच्या झिमाबाई गुलाब चव्हाण बिनविरोध सभापती होणार आहेत. तर उपसभापतीपदाची लॉटरी अपक्ष सूर्यकांत बिल्लेवाड यांना लागण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल १६ फेब्रुवारीस लागले. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी युती, आघाडीचे प्रयत्न सुरू झाले. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती-उपसभापतीपद कुणाला मिळणार, याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. मार्च महिन्यात प्रथम जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नंतर पं.स.सभापती, उपसभापतींची निवड होईल. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरमध्ये पं.स. सभापती व उपसभापतीपद कुणाला मिळते, हा विशेष उत्सुकतेचा विषय आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या पं.स.मध्ये या वेळी खा. अशोक चव्हाण यांना स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. काँग्रेसचे तीनच उमेदवार विजयी झाले. दोन जागा भाजपाने जिंकल्या तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराची सरशी झाली. त्यामुळे स्पष्ट बहुमत कुणालाच मिळालेले नाही. आरक्षणाच्या निकषांत बसणाऱ्या एकमेव उमेदवार असल्यामुळे काँग्रेसच्या झिमाबाई चव्हाण यांनाच सभापतीपद मिळणार आहे. पण उपसभापतीपदाच्या निवडणुकीत खरे राजकारण सुरू झाले आहे. काँगेस आणि भाजपा त्यासाठी बेरीज-वजाबाकीची गणिते मांडत आहेत. बहुमतासाठी अपक्ष सदस्य सूर्यकांत बिल्लेवाड यांची काँग्रेसला मनधरणी करावी लागणार आहे. अपक्ष सदस्य तटस्थ राहिला तर भाजपा आणि काँग्रेस या दोघांच्याही उमेदवारांना समान मते मिळतील. पण सूर्यकांत बिल्लेवाड यांच्या पाठिंब्याने ही निवडणूक काँग्रेसला जिंकता येऊ शकेल. मात्र, मलाच उपसभापतीपद द्या, अशी भूमिका त्यांनी घेतली, तर काय हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांची ही मागणी मान्य करून त्यांना उपसभापतीपद द्यायचे की अपक्षाला उगाच मोठे का करा, हा विचार करून उपसभापतींशिवायच भोकर पं.स. चे सभागृह चालविण्याचा प्रयत्न काँग्रेस अर्थात खा. अशोक चव्हाण करतात, हा भोकर परिसरात खमंग चर्चेचा विषय ठरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी राजीनामा देतो, साताऱ्यात पुन्हा निवडणूक घ्या !

News Desk

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावले!

News Desk

शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीदिनी गर्दी करु नका, संयम पाळा, मुख्यमंत्र्याचे आवाहन!

News Desk