HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपमध्ये दोन लाखांत तिकीट ?

  • मागतांनाचा व्हिडिओ व्हायरल

नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यंत स्वच्छ, पारदर्शक कारभार देण्याची हमी वारंवार देणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्येच तिकीटासाठी पैसे मागितल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून भाजपचे कार्यालयीन कार्यकर्ते तिकीटासाठी दोन लाख रूपयांची मागणी करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गुंडप्रवृत्तीच्या लोकांना भाजपमध्ये प्रवेश देणे, उमेदवारी देणे याविषयी आधीच विरोधकांच्या टीकांचे धनी झालेल्या भाजपला आता नाशिकमधील या प्रकऱणामुळे पुरते अडचणीत आणले आहे. नाशिकमध्ये भाजपा कार्यालयातच तिकीटासाठी पैशाची मागणी केली जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नाशिकमध्ये भाजपाच्या तिकीटासाठी कार्यालयीन कार्यकर्ते दोन लाख रुपयांची मागणी करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला. पक्ष कार्यालय, नेत्यांच्या घरासमोर इच्छुक उमेदवारांनी निदर्शने करुन पैसे घेऊन तिकीटे विकल्याचा आरोप केला होता. नाशिकच्या या घटनेमुळे त्या असंतोषाला बळकटी मिळू लागली आहे.

नाशिकमधल्या या व्हिडीओमुळे निवडणुकीत विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ भाजपच्याच एका इच्छुक निष्ठावान कार्यकर्त्यांने तयार केला असून त्यानेच तो व्हायरल केल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपामुळे महाराष्ट्रातमध्ये कोट्यवधींचे नुकसान

Adil

छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, राज्याभिषेक घराघरात !

News Desk

मोदी सरकारने काम करावे, बोलणे व डोलणे कमी करावे !

News Desk