HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री साहेब, या महिला पोलीस कर्मचाऱ्याला न्याय मिळेल का ?

पी. रामदास

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर– लातूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रामधील महिला कर्मचारी लोभा गणेश कांबळे यांनी वरिष्ठ लिपीक चंद्रकांत जाधव आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, वरिष्ठांवर कारवाई करण्याऐवजी या महिला कर्मचाऱ्यावरच आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोभा यांचे पती गणेश हे लातूर पोलिस दलात कार्यरत होते. 1998 मध्ये त्यांचं निधन झालं, त्यांच्या जागी 2008 मध्ये लोभा या पोलिस दलात अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागल्या. त्यानंतर वरिष्ठ लिपीक चंद्रकांत जाधव यांनी लोभा यांना कामावरून त्रास द्यायला सुरूवात केली. सुरूवातीला लोभा यांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र, जाधव यांच्याकडून अधिक त्रास व्हायला लागल्यानं लोभा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. त्रास काही केल्या कमी न झाल्यानं अखेर काही दिवसांपुर्वी लोभा यांनी ऑन ड्युटीच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या बचावल्या आहेत. मात्र, ज्या वरिष्ठ लिपीक चंद्रकात जाधव यांच्यामुळे लोभा यांच्यावर आत्महत्येची वेळ आली त्यांच्यावर पोलिस प्रशासनानं कुठलीच कारवाई केलेली नाही.

वरिष्ठ लिपीक चंद्रकांत जाधव यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमकावून लोभा कांबळे यांच्याविरोधात तक्रारी करायला लावल्याचा गंभीर आरोप लोभा यांनी केला. लोभा यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी फोनवरून केलेल्या संभाषणातून या गोष्टी स्पष्ट होत आहेत. प्रशिक्षण विभागाचे पोलिस उपमहानिरिक्षक विजयसिंह जाधव यांची लोभा यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता भेटही होऊ शकली नाही. वरिष्ठ लिपीक चंद्रकांत जाधव यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा का दाखल केलेला नाही, हे गुलदस्त्यातच आहे. वरिष्ठ लिपीक जाधव यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळं त्रस्त झालेल्या लोभा यांनी कार्यालयात सीसीटिव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी केली होती, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून लोभा या वैद्यकीय रजेवर आहेत. त्यातच त्यांनी वरिष्ठ लिपीक जाधव यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा केलेला प्रयत्न या घटनेचे गांभीर्य समजण्यास पुरेसं आहे. याप्रकरणी वेळीच कारवाई न झाल्यास कुठलाही अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ लिपीक जाधव यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निरुपम यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

swarit

नवनीत राणा यांनी घेतला एक अनोखा निर्णय!

News Desk

‘पेट्रोल दरवाढीच्या बदल्यात सुविधा मिळाल्यात’, सुजय विखे पाटलांची खोचक टीका

News Desk