HW News Marathi
महाराष्ट्र

माध्यमं मॅनेज होत नाहीत – पोलीस अधीक्षक मीणा

उत्तम बाबळे नांदेड :- इलेक्ट्राॅनिक्स मेडीया असो वा वृत्तपत्रे, या दोन्हींसह या क्षेत्रात काम करणा-यांवर ही माझा पुर्ण विश्वास आहे. माध्यम क्षेत्र ” मॅनेज ” होते असे म्हणनारे व म्हणने हे दोन्ही ही चुकीचे आहे असे मी समजतो.अशी प्रतिक्रिया नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी ४ मे रोजी भोकर येथे महाबातमीशी संवाद साधतांना प्रतिक्रीया दिली

नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय व पोलीस ठाणे भोकर येथे ४ मे २०१७ रोजी भेट दिली असता भोकर येथील पत्रकारांच्या शिष्ठ मंडळाने त्यांचे यथोचित स्वागत केले.या शिष्ठमंडळात संपादक उत्तम बाबळे,जेष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ,बाबूराव पाटील,मनोजसिंह चाैहान,अरुण डोईफोडे, शंकर कदम,श्रीकांत देव यांसह आदींचा समावेश होता.पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय भोकर येथे स्वागता नंतर पत्रकारांशी मनमुराद संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले की,हल्ली कांही लोक माध्यमां विषयी चुकीची वल्गणा करतात. भारतीय लोकशाहीत माध्यम क्षेत्र हे चाैथा आणि महत्वाचा स्तंभ आहे.जेंव्हा क्रिया होते तेंव्हाच यातून प्रतिक्रिया उमटत असतात.त्यामुळे पत्रकारीता व पत्रकारांना मी आमचेच अंग समजतो,यावर विश्वास करतो.परंतू गैर कायद्याची कृत्य,व्यवसाय व गैर काद्याची कृत्य आणि व्यवसाय करणा-या व्यक्ती यांची मी कदापीही गय करणार नाही.या विषयीची स्वच्छता माेहिम मी राबविणार आहे. जिल्ह्यात होणा-या अप्रिय बाबींवर आळा घालण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत व हे करत असतांना पोलीस विभागाला आपल्या माध्यम क्षेत्राची आणि सर्व पत्रकारांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.आपल्या लिखानातून अप्रिय घटना,व्यवसाय, तशासी संबंधीत व्यक्ती आमच्यासमोर आणून द्याव्यात व जनसेवेत सहकार्य करावे अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा ठेवतो.असे ही ते म्हणाले.यावेळी भोकर चे अप्पर पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,भोकर उप विभागीय पोलीस अधिकारी बी.एम.वाळके यांची उपस्थिती होती. अतिरिक्त अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय भोकर येथे नूतन पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी दिलेल्या भेटीत या कार्यालयाच्या परिक्षेत्रातील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व भोकर पोलीस ठाणे अंतर्गतच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला आणि भोकर पोलीस ठाण्याची पाहणी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण | ५ जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही!

News Desk

राज्यातील मंदिरे खुली; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी घेतले परळीत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

News Desk

मी राष्ट्रवादीचा नेता मला कॉंग्रेसच्या नाराजीबद्दल काही माहित नाही!

News Desk