HW News Marathi
महाराष्ट्र

मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली

धार (गुजरात)- सरदार सरोवर धरणाची उंची कमी करण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या ९ दिवसांपासून कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली आहे. मेधा पाटकर आणि अन्य ११ कार्यकर्त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला असून त्यांच्या शरीरातील पाणीही कमी झाले आहे.

सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाची उंची वाढविल्याने १९२ गावे आणि ४० हजार कुटुंबांच्या अडचणी वाढणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जुलै रोजी सगळ्यांच्या पुनर्वसनाचे आदेश दिले आहेत, मात्र अजूनही पुनर्वसन करण्यात आलेले नाही याच्या निषेधार्थ मेधा पाटकरयांचे उपोषण सुरू आहे. तसेच सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाची उंची वाढविण्यालाही विरोध कायम ठेवला आहे. आज या उपोषणाचा नववा दिवस आहे. गुजरातमधल्या धार जिल्ह्याततील चिखल्दा गावात हे उपोषण सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाने डॉक्टरांचे एक पथक उपोषणाच्या ठिकाणी पाठवले आहे. मेधा पाटकर आणि इतर सगळ्या कार्यकर्त्यांना रूग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत,असे मत डॉक्टरांनी नोंदवले आहे. मात्र जोवर गावकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवररुग्णालयात दाखल होणार नाही आणि उपोषण मागेही घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. कोणतंही औषध घेण्यासही मेधा पाटकर आणि इतर कार्यकर्त्यांनी नकार दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांवर भाजपकडून आता मोठी जबाबदारी!

News Desk

‘मला शरद पवारांना भेटायला आवडतं’, पवारांच्या भेटींबाबत राऊतांच भाष्य

News Desk

नीलम गोऱ्हे यांची मध्यस्ती…निलेश लंकेंच्या अडचणीत वाढ ?

News Desk