HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी भाषा ही ज्ञानभाषा असायला हवी – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

उत्तम बाबळे

नांदेड : – शिक्षकांचे दायीत्व मिळवलेले ज्ञान समाजापर्यंत पोहचविणे हे आहे. हे ज्ञान पोहचवितांना मातृभाषेत असावे. आपली मातृभाषा मराठी आहे आपल्याना मिळणारे ज्ञान हे आपल्या मातृभाषेत असावे म्हणून मराठी भाषा ही ज्ञानभाषा असायला हवी, असे मत विद्यापीठे कुलगुरू डॉ- पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अब्जांश तंत्रज्ञान’ (नॅनो टेकनॉलॉजी) या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे दिलीप करंबेळकर, समन्वयक माजी प्राचार्य डॉ. वसंत वाघ, डॉ. अनिल लचके, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. दीपक पानसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ अगदी सहज आणि सोप्या भाषेत लिहिली. त्यांचे ज्ञान आणि अभ्यास अगाध होते. प्रत्येक विषय त्यांनी भाषा शैली वापरून सहजगरीत्या आपल्या समोर मांडले. एखादा विषय जोपर्यंत आपल्या स्वतःला समाजात नाही तोपर्यंत आपण इतरांना समजावून सांगू शकत नाही. या मराठी विश्वकोशात निर्मिती मंडळामध्ये ‘अब्जांश तंत्रज्ञान’ कार्यशाळेमध्ये आपणास हेच करावयाचे आहे. किचकट असलेले विषय किंवा नावे अगदी सोप्या आणि मराठी भाषेत संग्रहीत करावयाचे आहेत. काही इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द तयार करावयाचे आहेत. आपण लिहिलेला लेख समीक्षकांकडून तपासून घ्यावा. चांगले आणि योजनाबद्ध केलेले लिखाण अनेक भाषांमध्ये रूपांतरित होऊन पुढे जगभर प्रसिद्ध होतो आणि अनेकांना त्याचा उपयोग होतो.

यावेळी डॉ.करंबेळकर यांनी मराठी विश्वकोशाची कार्य स्वरूप आणि व्याप्ती या विषयावर विस्तृतपणे विचार मांडले. समन्वयक माजी प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांनी ‘अब्जांश तंत्रज्ञान’ ज्ञानमंडळाचे कार्य स्वरूप व व्याप्ती यावर भाष्य केले. विज्ञान लेखक डॉ. अरुण फडके यांनी वैज्ञानिकांनी मराठी लेखन करतांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर योग्य पर्यायी शब्द, लेखन आशय व भाषा संपादन यावर आपले मत मांडले. डॉ. अनिल लचके यांनीही वैज्ञानिक लेखनावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. भगवान जाधव यांनी केले. यावेळी डॉ.एस.व्ही. बोरासकर, डॉ.स्नेहा खोब्रागडे, डॉ. संजय ढोले, डॉ. आर.एल. देवपूरकर, डॉ. सुहास जेजुरीकर, डॉ. योगेश थोरात, डॉ. विकास गीते, डॉ. शोभना भिडे, डॉ.नलावडे, डॉ.डी.एस.आडकर, डॉ.एस.डब्लू. गोसावी, डॉ. दीप्ती सिधये, डॉ. सतीश पाटील, डॉ. प्रवीण वाळके यांच्यासह विद्यापीठ परिसरातील विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक उपस्थित होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीच्या नावात ज्याचं ‘शिव’हरवलं त्यांनी एनडीएमध्ये राम उरलाय का याची चर्चा करणं हास्यास्पद!

News Desk

“सत्यजीतने फार ताणून न धरता, काँग्रेसचा सहयोगी म्हणून काम करावे”, अजित पवारांची इच्छा

Aprna

स्वतंत्र दिव्यांग विभाग असणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून या विभागासाठी ११४३ कोटींची तरतूद! – मुख्यमंत्री

Aprna