HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजाचा मुंबईत एल्गार !

मुंबई – कोपर्डी अत्याचार पीडितांना न्याय मिळवून देणे, अट्रासिटीसारख्या कायद्यांचा गैरवापर रोखणे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात मराठा समाजाकडून उर्त्स्फूतपणे ५७ भव्य मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र त्यानंतरही शासन दरबारी न्याय न मिळाल्याने आज ऑगस्ट क्रांती दिनी मुंबईत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला आहे. त्यामुळे अवघी मुंबापूरी मराठामय झाली आहे.

नियोजनानुसार सकाळी बरोबर अकरा वाजता भायखळा येथील वीरमाता जिजामाता उद्यान येथून सुरू झालेला हा मोर्चा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धपणे आझाद मैदानाकडे मार्गस्थ झाला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तब्बल २० हजार पोलिसांचा फौजफाटा या भागात तैनात करण्यात आला आहे. तसेच सुमारे २० हजार स्थानिक स्वयंसेवकांचा चमूही मुंबईत राज्यभरातून येणाऱ्या मोर्चकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी झटत आहे. मात्र कुणीही शिस्त न मोडताच पोलिसांनी करून दिलेल्या जागेतूनच मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे पूर्णपणे शांततेत चालला आहे.

राज्यभरातून लाखो मराठा बांधव या मोर्चासाठी काल- परवापासूनच मुंबईत दाखल झाले होते. राज्यभरातील अन्य ठिकाणच्या मूक मोर्चाप्रमाणेच मुंबईतील मोर्चातही मराठा महिला आघाडीवर होत्या. त्यांच्या मागोमाग भव्य जनसागर लोटला होता. जिजामाता उद्यानात मोर्चाला सुरुवात झाली, तेव्हा मोर्चेकऱ्यांचे दुसरे टोक येथून पाच किमी अंतरावरील दादरपर्यंत पोहोचले होते. मोर्चासाठी विविध राजकीय पक्षांनी वाटेत लावलेले बॅनर मोर्चेकरी फाडून टाकत होते. कोणत्या राजकीय पक्षाला मोर्चात नेतेगिरी करू द्यायची नाही, यावर मोर्चेकरी ठाम आहेत.

दरम्यान, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती आणि शाहू छत्रपती हेही या मोर्चात सहभागी झाले होते. परंतु ते सामान्य मोर्चेकऱ्यासोबतच चालत होते. तसेच सर्वपक्षीय आमदारांनीही भगवे फेटे बांधून मोर्चात सहभाग नोंदविला. मोर्चाची दखल घेत सरकारने आजच एक ओळीचा ठराव करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसेच हा ५८ वा आणि अखेरचा मोर्चा असून यानंतरही मागण्या मान्य न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी’-संजय राऊत

News Desk

कंगनाच्या ऑफिसवर पालिकेचा हातोडा, तर कंगनाने बीएमसीची तुलना केली बाबराशी 

News Desk

“ना डरुंगी ना झुकुंगी”, मुंबईत येण्याआधी कंगनाचे ट्विट

News Desk