HW News Marathi
महाराष्ट्र

मला शिक्षण खात्यात काम करायला आवडेल !

धुळे । युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (१९ जुलै) धुळ्यातील तरुणांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरेंनी धुळे जिल्ह्यातून रोड शो देखील काढला. तरुणांची मोठी फौज दुचाकीसह या रोड शोमध्ये सहभागी झाली होती. युवकांशी संवाद साधताना “युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला शिक्षणमंत्री म्हणून प्रचारात यायला आवडेल का ?”, असा प्रश्न एका तरुणाने आदित्य यांना विचारला. त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “शिक्षण खाते हे गृहखात्या इतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला नक्कीच शिक्षण खात्यात काम करायला आवडेल.”

युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एखाद्या युवा नेत्याची गरज असते. तोच हे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो, असे युवा पिढीचे एकंदर मत आहे. त्यामुळे, या पुढील काळात युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला शिक्षणमंत्री म्हणून प्रचारात यायला आवडेल का ?, असा प्रश्न एका तरुणाने विचारला. त्यावर “आपल्या देशात असे मानले जाते कि गृहखाते हे सर्वात महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्या भवितHव्याचा विचार केला तर शिक्षण खाते हे तितकेच महत्त्वाचे आहे. मला नक्कीच शिक्षण खात्यात काम करायला आवडेल”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या!

News Desk

“माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार!” – मलिकांच्या ट्वीटने चर्चेला उधाण

News Desk

भाजपला जडला महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग!

News Desk