HW News Marathi
महाराष्ट्र

“माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार!” – मलिकांच्या ट्वीटने चर्चेला उधाण

मुंबई। “मित्रांनो, मी ऐकले की, माझ्या घरी आज, उद्या सरकारी पाहुणे येणार आहे. मी त्यांचे स्वागत करणार,” असे ट्वीट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. मलिकांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे या महाविकासआघाडी नेत्यांनी ईडीच्या धाडी आणि चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मलिकांच्या घरी देखील ईडी येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

मलिकांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “मित्रांनो, मी ऐकले की, माझ्या घरी आज, उद्या सरकारी पाहूणे येणार आहे. मी त्यांचे स्वागत करणार आहे. घाबरणे म्हणजे रोज रोज मरण्यासारख्येमरण्यासारख्ये, आम्ही घाबरणा नाही, लढणार आहोत, गांधी गोऱ्यांशी होते, आम्ही चोरांशी लढणार, “

वानखेडे प्रकरणी मलिकांचा माफिनामा

मुंबई क्रूझ प्रकरणातनंतर मलिकांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात खोटे जातीचे प्रमाणपत्रावरून त्यांच्या आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. यावर वानखेडेंच्या कुटुंबांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर काल (१० डिसेंबर) सुनावणीदरम्यान न्यायालयाने मलिकांना फटकारले. वानखेडेंबद्दल केलेल्या विधानाबाबत बिनशर्त माफी मागितली आहे. यापुढे वानखेडेबद्दल कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी मलिकांनी न्यायालयासमोर दिले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवावं, भाजपची मागणी

News Desk

४० वर्षे भाजपची सेवा केली हे चुकलं का? भाजप नगरसेवकाने लावले नाराजीचे होर्डिंग्ज!

News Desk

संजय राऊत बिथरले आहेत त्यांना मानसोपचार तज्ञाला दाखवण्याची गरज, शेलारांचा खरमरीत टोला

News Desk