नवी दिल्ली। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातलाय, तर चिपळूण, महाडनंतर आता कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील झालेल्या पूरस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे.
महाराष्ट्राला केंद्राकडू सर्वतोपरी मदत
अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दिली आहे. यावेळी सुप्रिया सुळे, अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील महापुराची माहिती दिली. तसंच रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांचीही माहिती दिली. त्यावेळी अमित शाहांकडूनही महाराष्ट्राला केंद्राकडू सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. या भेटीनंतर सुळे यांनी ट्वीट करुन अमित शाह यांचे आभार देखिल मानले आहेत.
Met Union Home Minister Hon. @AmitShah Ji regarding the Flood Situation in Maharashtra along with @ShivSena Rajya Sabha Members of Parliament- Hon. Anil Desai Ji and Priyanka Chaturvedi (@priyankac19
).
Thank you Hon. Amit Shah Ji for your time and assuring help for Maharashtra. pic.twitter.com/U8Pe2MbKMg— Supriya Sule (@supriya_sule) July 23, 2021
संरक्षण मंत्रालयाशी समन्वय
अजित पवार यांनी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यांना महाराष्ट्रातील सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव आणि मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्थितीचा आढावा
राज्यात सर्वदूर होत असलेल्या अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार जातीने लक्ष ठेवून आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्थितीचा आढावा घेतला. तसेच या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींना आपापल्या जिल्ह्यातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.