HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मोहटा देवस्थानला माहिती अधिकार लागू

 

अहमदनगर : येथील सुप्रिसद्ध मोहटा देवस्थान आता माहिती अधिकाराच्या अखत्यारीत आले आहे. ट्रस्ट शासकीय अनुदान घेत असल्याने देवस्थानला माहिती अधिकार लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा न्यायालयातील अपिलीय अधिकारी तथा जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी दिला आहे.

दरम्यान, जिल्हा न्यायाधीशांनी अध्यक्ष म्हणून या देवस्थानच्या किती बैठकांना हजेरी लावली, ही माहिती मागणारा अर्ज देवस्थानकडे वर्ग करण्याचे आदेशही माहिती अधिकाऱ्याला दिले आहेत. जिल्हा न्यायाधीश हे जगदंबा देवी ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष असतात. अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीशांनी सन २०१५, २०१६ व २०१७ या कार्यकाळात देवस्थानच्या किती बैठकांना हजेरी लावली. तसेच गत ११ जानेवारीला देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीला विद्यमान अध्यक्ष सुवर्णा केवले या उपस्थित होत्या का, याबाबतची माहिती जिल्हा न्यायालयाकडे माहिती अधिकारात मागण्यात आली होती.

ही माहिती अर्जदार मोहटा देवस्थान यांचे कार्यालयाकडून प्राप्त करुन घेऊ शकतात. तसेच ही माहिती अभिलेखातील असल्यामुळे न्यायालयात प्रमाणित प्रती घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार अर्ज करून माहिती घेऊ शकता, असे उत्तर प्रभारी माहिती अधिकारी शि. ग. कोल्हे यांनी दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर !

News Desk

देगलूरमधला विजय म्हणजे महाविकास आघाडीवरील जनतेच्या विश्वासावर शिक्कामोर्तब – धनंजय मुंडे

News Desk

शरद पवारांची प्रकृती उत्तम; नवाब मलिक यांची माहिती

News Desk