HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रारापाठोपाठ योगी सरकारच्या मंत्रीमंडळाचा होणार विस्तार, ६ नव्या मंत्र्यांना मिळणार संधी

लखनऊ | काही दिवसांपूर्वीच केंद्रात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यातही यूपीला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाले. योगी सरकार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. योगी सरकारचा हा तिसरा विस्तार असेल. यासाठी भाजप सरकारने नावे निश्चित केली आहेत. लवकरच यूपीमध्ये ६ नवीन मंत्री केले जातील. त्यामुळे निवडणुकीत जातीचे समीकरण जोडण्यात मदत होईल असे बोलले जात आहे.

जेपी नड्डा यांची भेट घेतली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या मंत्र्यांच्या यादीमध्ये जितिन प्रसाद आणि संजय निषाद यांची नावे आघाडीवर आहेत. त्याचबरोबर अन्य काही ओबीसी चेहर्‍यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि संघटनमंत्री सुनील बन्सल यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. शुक्रवारी स्वतंत्र देव सिंह पुन्हा एकदा दिल्लीच्या दौर्‍यावर गेले. स्वतंत्र देव सिंह यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. माहितीनुसार संजय निषाद यांना योगी मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल असे बोलले जात आहे.

विशेष बाब म्हणजे पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडनुकांच्या पार्श्वभुमीवर ही हलचाल करण्यात येत आहे. असा अंदाज वर्तवला जातोय त्या दृष्टीने योगी सरकारच्या मंत्रिमंडळात राजकीय आणि जातीय समीकरणाच्या विस्ताराची चर्चा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री आदित्य ठाकरेंनी मेट्रो कारशेड जागेची केली पाहणी

News Desk

‘पुण्याला शिथीलता द्या’ ! महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव

News Desk