HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे यांनी संजय तुर्डेंची भेट घेतली

मुंबई कुर्ला येथील प्रभाग क्रमांक 166 मधुन निवडून आलेले मनसेचे नगर सेवक संजय तुर्डे यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला यात संजय आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले असून जखमीना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .पराभवाच्या रागातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची तक्रार संजय तुर्डे यांनी पोलिसात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. या घटनेची माहिती राज ठाकरे यांना मिळताच राज ठाकरे यांनी रूग्णालयात जाऊन तुर्डे यांची भेट घेऊन गंभीर जखमी असलेल्या संजय तुरडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुंबई महानगरपालिकेचा निकाल हाती येताच भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी कुर्ल्यात पाहायला मिळाली.

महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संजय तुर्डे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाडिया इस्टेट, बि.नं.२, बैलबाजार, कुर्ला (प) येथे आनंदोत्सव साजरा करत होते. तर त्यांचे कार्यकर्ते एम. एन. रोडवरील लक्ष्मी निवास समोरील मंडपात जल्लोष करत होते. त्यावेळी काही जणांनी तुर्डे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात संजय यांच्यावर पेवर ब्लॅाक, चाकू, लोखंडी सळी, काठीने मारहाण करत पळ काढला. या हल्यात संजय आणि त्याचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. संजय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात नेले. या हल्याची माहिती मिळाल्यानंतर विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संजय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुधीर काटू, किरण पवार, सचिन कानडे, नितीन कानडे, कुणाल कानडे , विजय कानडे, दिपू सिंग, शाम खाटू, सुनिल माटुगडे, संजय पवार,हेमंत पवारसह इतर २० ते २५ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आता पर्यंत सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत भोईटे यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्कार करायला धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहेत का?”, तृप्ती देसाईंचा सवाल

News Desk

मनसेच्या नव्या झेंड्याला निवडणूक आयोगाची नोटीस

swarit

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna