HW News Marathi
महाराष्ट्र

रिसोड येथे आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मोर्चा

विनोद तायडे

वाशिम कर्जमाफीविरोधात २२मार्च ला महाराष्ट्र विधिमंडळात आमदार अमित झनक व इतर १९ आमदार ९ महिण्याकरिता हुकूमशाही पद्धतीने निलंबन करण्यात आले त्याचा निषेध म्हणून दिनांक २४ ला आमदार अमित झनक यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पासून ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.रिसोड विधानसभा युवक काँग्रेस रिसोड काँग्रेस सोशल मीडिया.एन. एस. यु आय.च्या वतीने निषेध आंदोलन करून निवेदन देण्यात आले.गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफिशिवाय पर्याय नाही परंतु शेतकऱ्याची व्यथा विधिमंडळात मांडणाऱ्या १९ आमदारांना निलंबित करून या सरकारला शेतकऱ्याचे काहीही घेणे देणे नाही अशे दाखवून दिले आमदारांचे निलंबन त्वरित मागे, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .निलंबन मागे न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू आणि होणाऱ्या परिनामास शासन जबाबदार राहील असे युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबुराव शिंदे यांनी सांगितले.प्रसंगी बाबूराव शिंदे,संतोष बाजड,बबन गारडे,प्रकाश वायभासे,अंकुश देशमुख,शामराव उगले,सुखदेव मोरे,बाबाराव ढोणे,रवी बोडखे,योगेश गारडे, गोपाल मोरे,चेतन पाटील,राहुल भुतेकर,संदीप खराटे व बहुसंख्य कार्यकते हजर होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी

News Desk

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरुवात

swarit

“हे देशाच्या जनतेचं दुर्दैव”, अजित पवार का संतापले?

News Desk