HW News Marathi
महाराष्ट्र

वाघिची गुरु शिष्याची जयंती राष्ट्रीय एकात्मेतेचं प्रतीक

विनोद तायडे

वाशिम जिल्हा अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जातो .दलितांवर अन्याय झाल्याच्या बर्याच घटनांची पोलीस दप्तरी नोंद आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीवर हल्ला झाल्याच्या बर्याच घटना घडलेल्या आहेत. मात्र रिसोड तालुक्यातील वाघि खुर्द येथे हिंदू मुस्लिम बौद्ध बांधवानी एकत्रित येत क्रान्तिसूर्य महात्मा फुले आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याची जयंती मिरवणूक काढून राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय दिला

दि 15 एप्रिल ला वाघि खुर्द येथील जेस्ट मुस्लिम बांधव शेख रशीदभाई शेख सम्मद यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मोफत पुस्तक वाटप उपक्रम राबविला आणि त्यांनी उत्सव समितीला डॉ बाबासाहेब आंबेडकर मूर्ती राऊफभाई यांच्या हस्ते भेट दिली .माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर मोरे, पोलीस पाटिल शेख शेगीर यांच्या हस्ते पंचशील ध्वजा रोहन करण्यात आले . महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमाना पुष्पहार अर्पण करुन प्रतिमेची वाजत-गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आली यावेळी ठाणेदार हरीश गवळी , एपीआय खंडारे यांची समायोजित भाषणे झालीत . कार्यक्रमाचे सूत्र संचालन सिद्धार्थ भालेराव यानी तर आभार हिंदूबांधव बालाजी शेवाले यानी मानले. वाघि खुर्द येथील ग्रामस्थानी गुरु शिष्याची जयंती एकत्रीत साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतच्या प्रकरणांमूळे महाराष्ट्र सरकार अस्थिर होऊ लागली तर आधीच केंद्रातील सरकार पडेल – संजय राऊत

News Desk

लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु आहे, कंगणाचे मुंबईतून निघतानाचे ट्विट

News Desk

“आता कुठे त्यांना घरातून डिस्चार्ज मिळाला आहे”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका..!

News Desk