HW News Marathi
महाराष्ट्र

विज्ञान एक्स्प्रेस’ नागपुरात; अनेक प्रयोग बंद असल्याने नाराजी

नागपूर ; गेल्या दहा वर्षांपासून सलग संपूर्ण भारतात प्रवास करणारी ‘विज्ञान एक्स्प्रेस’ सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाली. मात्र या रेल्वेगाडीतील बरेचसे प्रयोग बंद ठेवल्याने, तसेच माहिती देण्यासाठी तज्ज्ञ उपस्थित नसल्याने प्रदर्शन पाहायला येणाऱ्यांचा हिरमोड झाला.

वातावरणीय बदल संकल्पना, वातावरणीय बदलांचे परिणाम, अनुकलन, उपशमन, जलवायू परिवर्तनासंदर्भात आंतरराष्ट्रीय सहकार्य, शाश्वत क्रिया, जैवतंत्रज्ञान अशा विविध विषयांची माहिती विज्ञान एक्सप्रेसच्या विविध डब्यांमध्ये देण्यात आली आहे. ही माहिती जाणून घेताना विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसून आली. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बरेचसे प्रयोग बंद करून ठेवल्याने विद्यार्थ्यांना हाताळता आले नाही, तर अनेक ठिकाणी त्या विषयाची माहिती देणारेही कुणी नव्हते. त्यामुळे विद्याथ्र्यांमध्ये काहीशी नाराजी होती.

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा ‘विज्ञान एक्स्प्रेस’ हा उपक्रम असून १६ डब्यांचे हे वातानुकूलित फिरते प्रदर्शन २००७ पासून भारतभ्रमण करत आहे. पहिल्या चार पर्वात जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दखल घेतली गेली. त्यापुढील तीन पर्वात जैवविविधता विशेष प्रदर्शन होते, तर आठवे पर्व हे जागतिक तापमान वाढ आणि संबंधित आव्हानाला दर्शवणारे होते. सध्याचे नववे पर्व हे जलवायू परिवर्तन विशेष याच संकल्पनेसाठीचे दुसरे वर्ष असून त्याचा शुभारंभ १७ फेब्रुवारी २०१७ ला दिल्ली येथील सफदरजंग रेल्वेस्थानकावरून झाला.

१९ हजार किलोमीटरचा प्रवास १७ फेब्रुवारी ते ८ सप्टेंबर या कालावधीत ‘विज्ञान एक्स्प्रेस’ करणार असून यादरम्यान ६८ स्थानकावर ती मुक्काम करणार आहे. जलवायू परिवर्तन ही एक महत्त्वाची समस्या असून तिचे अनेक दीर्घकालीन व लघुकालीन परिणाम आहेत. हवामानाच्या रचनेत होणाऱ्या बदलामुळे शेती उत्पादनावर होणारे परिणाम असो, समुद्राच्या स्तरात होणारी वाढ असो, जलवायू परिवर्तन ही आता गोरगरिबांवर भयावह परिणाम करू शकणारी जागतिक समस्या आहे. तरीही जनसामान्याला त्याबद्दल फार थोडी माहिती आहे. या प्रदर्शनात त्याविषयी चर्चा आणि मंथन सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बनवले गेलेले हे प्रदर्शन जनसामान्यांसाठीही खुले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन!

News Desk

“आजही माझं प्रामाणिक मत, माझं मत मी बदलणार नाही”- विक्रम गोखले

News Desk

फडणवीस, पटोले, वळसे-पाटील ते दीया मिर्झा, ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित

News Desk