HW News Marathi
महाराष्ट्र

वैद्यकीय शिक्षण संकुलासाठी जागेची प्रधान सचिव देवरा यांच्याकडून पाहणी

 

मंत्री ना. गिरीष महाजन यांनी घातले आहे लक्ष

जळगाव जलसंपदा व उच्च – वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांनी जळगाव जिल्ह्यासाठी प्रस्तावित केलेल्या वैद्यकीय शिक्षण संकुलाच्या उभारणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी जळगाव शहरानजीक चिंचोली शिवारात जागेची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल होत्या.

जळगाव जिल्ह्यात राज्य शासनामार्फत नवीन शासकीय वैद्यकीय शिक्षण संकुल उभारण्याचे प्रस्तावित आहे. यात ळजनरल, डेन्टल, आयुर्वेदीक, फिजीओ थेरपी आदी शाखांचे वैद्यकीय शिक्षण मिळणार आहे. त्यासाठी जळगाव शहरानजिक असणाऱ्या शासकीय भूखंडाच्या जागेची पाहणी करण्यासाठी देवरा आज जळगावात होते. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. पी. टी. वाकोडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. एस. यु. मुंगल, तहसिलदार अमोल निकम व अरविंद अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

प्रस्तावित वैद्यकिय शिक्षण संकुलासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जळगाव तालुक्यातील देऊळवाडे, सावखेडा व चिंचोली शिवारातील जागांचे नकाशे सादर केले होते. यावेळी देवरा यांनी चिंचोली शिवारातील जागेसह महामार्गालगतच्या काही जागांची पाहणी केली. पाहणी केल्यानुसार सुमारे १४१ एकर जागेची उपलब्धता आहे, प्रत्यक्षात संकूल उभारणीसाठी ५० एकर जागेची प्राथमिक निकड आहे. त्यानुसार कामाच्या आवश्यकतेनुसार जागेची अंतिम निवड होईल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंक्की हिलजवळ दरड कोसळली

News Desk

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल

News Desk

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात 

News Desk