HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुक – गोवा 83 टक्के, पंजाबमध्ये 70 टक्के मतदान

….आता प्रतिक्षा निकालाची

चंदीगड/पणजी – पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पाडले. दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. गोव्यामध्ये मतदान संपले असून, एकूण 83 टक्के मतदान झाले. गोवा विधानसभेमध्ये 40 जागा आहेत. गोव्यामध्ये सत्ता कायम राखण्याचे भाजपासमोर आव्हान आहे.

सध्या केंद्रात संरक्षणमंत्री असलेले गोव्याचे नेते मनोहर पर्रिकर यांनी सत्ता कायम राखण्यासाठी प्रचारात पूर्ण जोर लावला आहे. गेल्या वेळी झालेल्या 84% मतदानाचा विक्रम यावेळी मोडीत निघेल, अशी प्रतिक्रिया पर्रिकर यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केली होती. भाजपाचा दोन तृतीयांश मताने विजय मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

निवडणुक गोव्याची, चर्चा देशपातळीवर

गोव्यात भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सत्तेच्या स्पर्धेत आहे. शिवसेनाही गोव्यात पहिल्यांदाच स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गोव्यामध्ये 40 जागांसाठी एकूण 251 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच, शिवसेना आणि मगोपने महायुती केली आहे. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी भाजपासाठी जास्त चुरशीची होण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या निकालाचीही उत्सुकता

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी एकाच टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले. पंजाबमध्ये अकाली दल-भाजपाची युतीने लागोपाठ तिस-यांदा सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाब विधानसभेमध्ये एकूण 117 जागा आहेत. 2012 मध्ये भाजपा-अकाली दल आघाडीने लागोपाठ दुस-यांदा सत्ता मिळवली होती. पंजाबमध्ये भाजपा-अकाली दल आघाडी, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सत्तेच्या स्पर्धेत आहे. पंजाबमध्ये 117 जागांसाठी 1145 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा; सरकारकडून २२९७ कोटी वितरित  करण्याचा आदेश काढला

News Desk

सरकार अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करत नाही | प्रकाश आंबेडकर

News Desk

“ज्यांनी हा विषय काढला त्यांना अधिक माहिती असेल”, राष्ट्रवादीत प्रवेश करणार का यावर खडसेंची प्रतिक्रिया…

News Desk