HW News Marathi
महाराष्ट्र

वार्तांकनावर निर्बंध आणणा-या नांदेड मनपाचा निषेध- विजय जोशी

उत्तम बाबळे नांदेड :- नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहूण वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार, प्रेस फोटो व व्हीडीओ ग्राफर यांना पत्रकार कक्षात जाण्यासाठी प्रवेश मज्जाव करुन चाैथ्या स्तंभाची महानगर पालिका प्रशासनाने मुस्कटदाबी केली असल्याने या निंदणीय घटनेचा नांदेड येथील सर्व पत्रकारांच्या वतीने मराठी पत्रकार परिषद तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते,तसेच यापुढे महापालिकांच्या प्रसिध्दी पत्रकावर व बातम्यांवर पत्रकारांनी बहिष्कार घालावा, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव तथा दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांनी केले आहे.

कै.डा.शंकरराव चव्हाण सभागृहात २६ मे २०१७ रोजी नांदेड वाघाळा महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा होती.या सभेचे कामकाज पाहून वार्तांकन करण्यासाठी नांदेड शहरातील अनेक पत्रकार,फोटो व व्हीडीओ ग्राफर महापालिकेत गेले असता पत्रकार कक्ष गॅलरीत जाण्याचा दरवाजा बंद केलेला व दरवाजावर महापाैर तथा पीठासिन अधिकारी यांच्या आदेशाने तिस-या माळ्यावरील ३०५ क्रमांकाच्या खोलीत पत्रकार आणि अभ्यंगतांची बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती लिहल्याचा फलक लावलेला दिसला.यामुळे तेथे जमलेल्या जेष्ठ पत्रकार विजय जोशी,प्रल्हाद कांबळे,विजय निलंगेकर,प्रल्हाद लोहेकर,यासह आदी पत्रकारांनी याबाबदचा जाब विचारला असता महापालिका प्रशासन अधिका-यांनी सांगीतले की,कामकाजाचे लाईव्ह चित्रीकरण पाहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आहे.तेथे बसावे.परंतू सदरील ठिकाणी बसण्यास नकार देत सर्व पत्रकारांनी याचा तीव्र निषेध व्यक्त करत वार्तांकनावर बहिष्कार टाकला. दरम्यानच्या काळात झालेल्या सभेत शिवसेना,भाजपा नगरसेवकांनी पत्रकारांच्या प्रवेश मज्जावाचे कारण महापाैर तथा पीठासिन अधिकारी साै.शैलजा स्वामी यांना विचारले व याचा तीव्र निषेध व्यक्त केला.तसेच नगरेश्वर मंदिराच्या जागेचा विषय ठरावात न घेतल्याच्या कारणावरुन राजदंड पळविला. या घटनेबाबद पत्रकारांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात पत्रकात विजय जोशी यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या सभेचे वार्तांकन करण्यासाठी सबंध देशात व महाराष्ट्र राज्यात सर्वच ठिकाणी विविध सभागृहात व स्थानिक स्वराज्य संस्थात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहापासून ते विधानसभेच्या सभागृहातही पत्रकारांना प्रवेश दिला जातो. तेथे सन्मान केल्या जातो, मात्र आज नांदेड वाघाळा महापालिकेने लोकशाहीच्या या चौथा स्तंभाचा गळाच घोटला आहे. मागच्या सभेच्यावेळी एका नगरसेवकाने केलेल्या गोंधळाचे चित्रीकरण सर्व टी.व्ही. चॅनलनी प्रसिध्द केल्यामुळे चिडलेल्या महापालिकेने गुपचूपपणे पत्रकार कक्ष गॅलरी बंद करुन त्याला टाळे ठोकले आहे. पत्रकारांचा आवाज पूर्णपणे बंद करण्यासाठी केलेली ही कृती निषेधार्ह आहे. महापालिकेच्या कारभाराचे वार्तांकन करुन जनतेसमोर आणण्याचा पत्रकारांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. सभागृहात नेमके काय चालते, याची माहिती आम जनतेला व्हावी, यासाठी सर्वच सभांमध्ये पत्रकारांना प्रवेश ठेवण्यात आला आहे. महापालिकेची वास्तू निर्माण झाल्यानंतर शंकरराव चव्हाण सभागृह महापालिका याठिकाणी नगरसेवकांचे पती व नागरिक तसेच पत्रकारांसाठी विशेष दालन निर्माण करण्यात आले आहे. मात्र आज ते दालन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. लोकशाहीचा आवाज दाबण्यासाठी व वस्तूस्थिती समोर आणण्यासाठी पत्रकार याठिकाणी येत असतात. मात्र चिडलेल्या मनपा पदाधिकारी प्रशासनाने आज हे दालन बंद करुन लोकशाहीचीच मुस्कटदाबी केली आहे. याचा मराठी पत्रकार परिषद तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असून, यापुढे महापालिकांच्या बातम्यावर तसेच प्रसिध्दी पत्रकावर पत्रकारांनी बहिष्कार घालावा, असे आवाहनही विजय जोशी यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व धार्मिक स्थळे ८ सप्टेंबरपर्यंत सुरु करा अन्यथा आंदोलन करु, रामदास आठवलेंचा इशारा 

News Desk

ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

Aprna

राजकारणातील मोठी बातमी ! राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट

News Desk