HW News Marathi
महाराष्ट्र

रान डुक्कराचा घरात घुसून महिलेवर हल्ला

विनोद तायडे

वाशिम

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुकांडा येथे रान डुक्कराने घरात घुसून महिलेवर हल्ला केल्याची घटना दि 26 मार्चला संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली महिला गंभीर जाक्ष्मी झाली असून तिला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे

मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे रानडुकाराचा हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत असून 1 वर्षांपूर्वी एकाला प्राण गमवावे लागले सुकांडा गाव दहशतीखाली वावरत आहे दि 26 मार्चला सौ बालाबाई विलासराव घुगे वय 36 वर्ष घरात कुटूंबासह स्वयंपाक करीत असताना सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अचानक रान डुक्कर घरात घुसले महिलेला गंभीर जखमी करत सुसाट वेगाने भिंतीवरून उडी मारून गोट्यासमध्ये लपले .गंभीर जखमी महिलेला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले घटनेची माहिती वनविभागाला होताच 1 तासाने पथक घटना स्थळी पोहचले पोलिसही मदतीला धावले रान दुकराने गोठ्यातील बैल व म्हशीला जखमी केले वनविभागाने तीन तास रान डुकाराला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला गावातील युवक मदतीला धावले रान डुक्करा ला पकडण्यासाठी वागोटे लावण्यात आले मात्र रानडुक्कर गोठ्यात दडून बसले काही केल्या ते बाहेर येत नव्हते तीन तासानंतर त्याला हुसकण्यात आले वाघाटे व्यवस्थित लावण्यात न आल्याने ते पळून जाण्यास यशस्वी झाले आणि वन विभाग पाहत राहिला वन विभागाचे नियोजन शून्य काम पाहायला मिळाले घटनेने मात्र गावात दहशतीचे वातावरणपसरले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून सत्ता स्थपानेचा दावा नाही, विलंबाबाबत राज्यपालांशी चर्चा !

News Desk

गडचिरोलीत ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच हातात स्टेअरिंग आहे असं म्हणू द्या, पण अजितदादांनी ट्विट करुन सगळं सांगितलं – विनायक मेटे

News Desk