HW News Marathi
महाराष्ट्र

वस्तुस्वरुपात मिळणारा शासकीय लाभ आता रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात होणार जमा         

उत्तम बाबळे

नांदेड विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुस्वरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर आता रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नियोजन विभागाने नुकताच निर्णय घेतला असून या निर्णयामुळे लाभार्थ्याला त्या वस्तू योग्यरित्या पारखून घेता येतील. शासनाच्या विविध योजनां मार्फत लाभार्थ्याला शासनाने किंवा जिल्हास्तरीय शासकिय अधिका-यांनी खरेदी करुन दिलेल्याच वस्त दिल्या जायच्या.यात अनेक वेळा त्या निकृष्ट असल्याच्या तक्रारी व्हायच्या व भ्रष्टाचार झाल्याचे आरोप देखील व्हायचे.यामुळे युतीच्या राज्य शासनाने काही अंशी यात पारदर्शकता आणण्याच्या हेतूने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयात दर्शविण्यात आलेल्या वस्तुंची नावे पुढील प्रमाणे आहेत. कृषी निविष्ठा ( जैविक / सेंद्रीय खते / सूक्ष्म मूलद्रव्ये व अन्य ), भूसुधारके ( जिप्सम व अन्य ), सूक्ष्म सिंचने साधने ( ठिबक, तुषार व अन्य ), शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या व त्यांचे संवर्धनासाठीचे साहित्य, दुग्ध व्यवसायासाठीचे साहित्य. संरक्षित शेतीसाठीचे साहित्य. अच्छादन व अस्तरीकरण साहित्य. एकात्मिक कीड व अन्न व्यवस्थापनसाठीच्या निविष्ठा. कृषी प्रक्रियेसाठीचे साहित्य व उपकरणे. रेशीम उत्पादनासाठीचे साहित्य व उपकरणे, कृषी माल हाताळणी व वाहतूक सामग्री. आवेष्टन, संकलन व प्रतवारी उपकरणे. स्वेटर, शाल, साबण, हेअर ऑईल, झेरॉक्स मशीन, टिनपत्रे या साहित्यांचा शासन निर्णयात समावेश असून याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नियोजन विभागाचे अवर सचिव प्रियंका छापवाले यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर आमचे समाधान नाही – सुनील तटकरे 

News Desk

“बॅनरवर ‘विकासपुरुष’ लिहिल्याने…”, रोहित पवारांचा भाजपला टोला!

News Desk

संजय राऊतांचे आरोप गंभीर, चौकशी करा!; नाना पटोलेंची मागणी

Aprna