HW News Marathi
महाराष्ट्र

वाहनांवरील लाल व अंबर दिवे तात्काळ काढून टाका –  आरटीओ नांदेड 

उच्च पदस्थांच्या एस्कॉर्टींग करणाऱ्या वाहनांवर दिवे लावता येणार नाहीत

उत्तम बाबळे

नोंदेड :- जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी केंद्र शासनाच्या सुधारणेनुसार ज्या वाहनांवर दिवा लावण्यास अनुज्ञेय नाही त्या वाहनांवरील लाल, अंबर दिवे व ॲम्ब्युलन्सवरील दिवे काढून टाकावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

केंद्र सरकारने १ मे २०१७ रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १०८ मध्ये सुधारणा केली आहे. या तरतुदीनुसार वाहनांवरील लाल , अंबर दिवा तसेच ॲम्ब्युलन्सवरील दिवा अनुज्ञेय नाही. त्याच बरोबर उच्च पदस्थांच्या एस्कॉर्टींग करणाऱ्या वाहनांवर दिवे लावता येणार नाहीत. आपत्कालीन किंवा आणिबाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट प्रकारची रचना केलेल्या वाहनांवर केंद्र शासन विनिर्दिष्ट करेल त्यानुसार बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा लावण्यास परवानगी आहे. त्याशिवाय एअरपोर्ट, बंदरक्षेत्र, खनिक्षेत्र आणि प्रकल्पांच्या क्षेत्रात चालणाऱ्या वाहनांवर त्यांच्या कार्यक्षेत्रात अंबर दिवा लावता येईल.तरी ही दिवे अशा वाहनधारकांनी तात्काळ काढून घ्यावेत अन्यथा मोटार वाहन नूतन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नांदेड यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“भाजप गरुडासारखी, कितीही डोमकावळे मानेवर बसले तरी सगळ्यांना पुरून उरू!”

News Desk

पोलीस दलाच्या अत्याधुनिक कार्यपद्धतीमुळे जनमानसात पोलीसांप्रति विश्वासार्हता! – जयंत पाटील

Aprna

संघाच्या गुरुंनी आम्हाला कधीही मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवला नाही !

News Desk
मुंबई

पुण्यात नागानेच नागाला गिळलं!

News Desk

पुणे शेतात निद्रावस्थेत पडलेला नाग सर्पमित्र रशीद शेख यांनी पकडला. मात्र त्याने काहीतरी गिळल्याचं दिसून आलं. नागाला जंगलात सोडण्याआधी रशीद यांनी नागाला गिळलेली वस्तू बाहेर काढण्यास भाग पाडले.

जेव्हा नागानं ती वस्तू बाहेर काढली त्यावेळी सगळ्यांनाच धक्का बसला. कारण त्याच्या तोंडातून भला मोठा नागच बाहेर आला होता. कारण नागानं चक्क दुसऱ्याच नागाला गिळलं होतं.

Related posts

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षांची शिक्षा

swarit

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी रिपाइंची जाहीर सभा

News Desk

आयसीआसीआय बँकेच्या संचालक आणि सीओओ पदावरुन चंदा कोचर यांची उचलबांगडी

News Desk