HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजप गरुडासारखी, कितीही डोमकावळे मानेवर बसले तरी सगळ्यांना पुरून उरू!”

मुंबई। भाजप गरुडासारखी आहे. यामुळे कितीही डोमकावळे मानेवर बसले की, एकदा आपण पंख पसरले तर या सगळ्यांना पुरून उरू, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचं अल्पसंख्यांक नवाब मलिक यांना लगावला आहे. फडणवीसांनी आज (१६ नोव्हेंबर) भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते.
या महाविकासआघाडी सरकारविरोधात आपण सर्वांनी एकत्रित करून उभा करायता आहे. या सरकारनं लोकांचा विश्वासघात केला असून आपण सर्वांनी त्यांना आपली ताकद दाखवून देऊ या, अशा शब्दात फडणवीसांनी बैठकीला संबोधित केले.
फडणवीस नेमके काय म्हणालं
दरम्यान, “काही लोकं हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत टीव्हीवर दिसतात. तर काही कोंबडे दिवसभर चॅनेलवर दिसतात. गरुडावर कावळा बसतो. तो गरुडाला चोच मारतो. गरुड काहीही बोलत नाही. मग गरुड दोन्ही पंख पसरुन आकाशात झेप घेतो. इतक्या उंचावर जातो की, कावळ्याला श्वास घेता येत नाही तो खाली पडतो. भाजप गरुडासारखी आहे. कितीही डोमकावळे मानेवर बसले की एकदा आपण पंख पसरले तर या सगळ्यांना पुरून उरू, असे फडणवीस म्हणालं.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक पोलिसांचा गौरव, रणजित पाटील यांनी केले आयुक्तांचे अभिनंदन

News Desk

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा एसटी सोडण्याचे आदेश

News Desk

जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची शासनाची तयारी! – अजित पवार

Aprna