HW News Marathi
महाराष्ट्र

वाहून गेलेल्या,पिता-पुत्राचा मृतदेह कर्जतच्या आषाणे धबधब्याच्या नाल्यात सापडला

कर्जत : प्रसिद्ध असलेल्या भिवपुरी रोड स्टेशन येथील आषाणे धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले दोघे जण वाहून गेले आहेत. आषाणे धबधब्याचे पाणी खाली उल्हास नदीकडे ज्या नाल्यातून वाहत जाते, त्या नाल्यातून ते दोघे वाहून गेले आहेत. दरम्यान, या धबधब्यावर वर्षासहल आणि पर्यटनासाठी प्रशासनाने बंदी घातलेली असल्याने वाहून गेलेले दोघे पिता-पुत्र नाल्यात भिजण्याचा आनंद घेत होते. त्यातील वडील किरण प्रकाश बोराडे यांचा मृतदेह सापडला आहे. या धबधब्यावर यापूर्वी अनेकांचे बळी गेले आहेत.

आज मुंबई धारावी येथून किरण बोराडे हे आपल्या पुत्रासह वर्षासहलीसाठी कर्जतला गेले होते. भिवपुरी रोड स्टेशनवर उतरून किरण बोराडे आपल्या पुत्रासह कर्जत रस्त्याने चालत उमरोली गावाच्या पुढे जात असताना त्यांना पोलिसांनी धबधब्यावर जाणे बंद केले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे बोराडे हे आषाणे धबधब्याचे पाणी उल्हास नदीला जाताना ज्या नाल्यातून वाहत जाते, त्या नाल्यावर मौजमजा करण्याचा निर्णय घेतला. किरण प्रकाश बोराडे आणि त्यांचा मुलगा तेजस हा उमरोली गावचे गणपती विसर्जन केले जात असलेल्या नाल्यावरील गणेश घाटावर पोहचले. तेथे नाल्यात उतरून भिजण्याचा आनंद घेत असताना त्या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू होता.त्यावेळी भिजण्याच्या मूडमध्ये असताना पाण्याची पातळी वाढत होती. हे त्या भागात नवीन असलेल्या बोराडे पिता पुत्राला माहीत नव्हते. त्या पाण्याने बोराडे यांचा घात केला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते दोघे वाहून गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी नाही

swarit

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढल्याच्या आरोपाला आता शरद पवारांकडून राज ठाकरेंना उत्तर!

News Desk

“मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी तर पवारांना बारमालकांची, सामान्य माणसा तुच तुझा वाली”

News Desk