HW News Marathi
महाराष्ट्र

शार्पशुटर शंकर भारती यांचा पोलीस अधिक्षक येनपूरे यांच्या हस्ते सत्कार 

उत्तम बाबळे नांदेड :- १७ वी महाराष्ट्र राज्य पोलीस रायफल,रिव्हाॅलवर,पिस्टल व कार्बाईन नेमबाजी स्पर्धा दाैंड जि.पुणे येथे संपन्न झाली.या स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस विभागातर्फे भाग घेतलेल्या शार्पशुटर पोलीस शंकर बालाजी भारती यांनी ५ पदके मिळऊन घवघवीत यश संपादन करत नांदेड जिल्हा पोलीस दलाचे नाव व बहुमान राज्यात वाढविल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक संजय येनपूरे यांनी त्यांचा प्रशस्तीपत्र,रोख बक्षीस देऊन भव्य सत्कार केला आहे. एस.आर.पी.एफ.ग्रुप ५ ,दाैड जिल्हा पुणे येथे २७ फेब्रुवारी २०१७ ते २ मार्च २०१७ दरम्यान उपरोक्त राज्य पोलीसांची नेमबाजी स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत नांदेड पोलीस दलातर्फे नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई शार्पशुटर शंकर बालाजी भारती यांनी भाग घेतला.तसेच या स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्ण पदक,एक रोप्य पदक,दोन कांस्य पदक असे एकूण पाच पदके व सर्वोत्कृष्ठ नेमबाजीची ट्राॅफी मिळऊन घवघवीत यश संपादन करत नांदेड जिल्हा पोलीस दलाचा महाराष्ट्र राज्य पोलीसांत बहुमान राखला. या उत्युंग यशाचे काैतुक करत नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक संजय येनपूरे यांनी नांदेड पोलीस दलाचा शार्पशुटर शंकर बालाजी भारती यांचा प्रशस्तीपत्र,रोख बक्षीस देऊन यथोचित भव्य सत्कार १९ एप्रिल रोजी पोलीस मुख्यालय नांदेड येथे केला आहे. यावेळी भोकर अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक संदिप गुरमे,यांसह जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी बहुसंख्येने उपस्थीत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रशांत किशोरची मला गरज नाही – शरद पवार

News Desk

सरकार कधी स्थापन होणार हे  भाजप-शिवसेनेलाच विचारा !

News Desk

सध्या ‘मनसे’सोबत युती नाही, कार्यपद्धती बदलली तर युतीवर चर्चा करण्यासाठी तयार !

News Desk