गौतम वाघ
– भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी यांचा प्रताप
उल्हासनगर- भाजपचा जातीयवादी माजी आमदार कुमार आयलानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून घोर अवमान केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगर महानगर पालिकेच्या मुख्यालयात घडली आहे. सदर घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. कुमार आयलानी यांनी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा शहरात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिला.
उल्हासनगर महानगर पालिकेत परवा स्थायी समीतीच्या सभापतीची निवडणूक पार पडली. निवडणूक संपल्यावर मुख्यालयातील महापुरुषांच्या पुतळ्याना पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली होती. त्यावेळी महापौर मीना आयलानी, उपमहापौर जिवन ईदनानी, नवनिर्वाचीत स्थायी समिती सभापती कंचन लूंड सोबत भाजपाचे माजी आमदार कुमार आयलानी सुध्दा सोबत होते. माजी आमदार कुमार आयलानी यांनी चक्क छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर खादयावर हात ठेवून फोटो काढून शिवाजी महारांचा घोर अवमान केला.सदरची बाब अतिशय गंभीर असून छत्रपति शिवाजी महाराजांचा घोर अवमान करणा-या त्या भाजपाचा जातियवादी माजी आमदार कुमार आयलानी याच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने शहरात उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा ईशारा शिवसेना शहर प्रमुख राजेद्र चौधरी यांनी दिला आहे. यापुर्वी भाजपा नगरसेवक व तत्कालीन उपमहापौर जमनादास पुरस्वानी यांनी ही महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पायात बूट घालून हार घालून अवमान केला होता. त्यावेळी शेकडो भिमसैनिक, व शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते व त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.