HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीचे संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागी संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजप उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान, भाजपचे उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार करणार मतदान करणार होते. मात्र, संख्याबळ नसल्याने भाजपने माघार घेतली आहे. संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे जुने संबंध असून संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे.

शरद पवार यांनी संजय दौड यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता व तो शब्द राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा देऊन पूर्ण केला. दरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झालेल्या संजय दौंड यांच्या रूपाने बीड जिल्ह्यात आणखी एक आमदारकी आली असून जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मिळून काम करू, असे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंच्या जीवाला धोका, केंद्राने दिली Z Plus सुरक्षा

News Desk

‘प्रयास’च्या सायकल रॅली माध्यमातून वाहतूक नियम आणि आरोग्याविषयी जनजागृती

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसची जय्यत तयारी

News Desk