HW News Marathi
महाराष्ट्र

शिवरायांचे वंशज करणार मराठा मोर्चाचे नेतृत्व

सातारा : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे.या भव्य मोर्चासाठी २१० सदस्यांचा समावेश असलेल्या राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून उदयनराजे भोसले व संभाजीराजे यांच्याकडे सूत्रे देण्यात आल्याची माहिती समन्वय समितीचे संयोजक करण गायकर यांनी दिली. कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणानंतर विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा क्रांतिदिनी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात राज्यभरातील लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे मुंबईत चक्काजाम होण्याची शक्यता आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही वंशजांना सोबत घेतल्याने त्यांच्या मागण्यांना बळकटी मिळणार आहे. तसेच त्यानिमित्ताने कोल्हापूर व सातारा या दोन्ही गाद्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले हे लोकनियुक्त तर खासदार संभाजीराजे हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याणमधून 7 नक्षवाद्याना अटक, भीमा कोरेगाव प्रकरणात सामिल?

swarit

आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचं नाही!

News Desk

मेहबूब शेख प्रकरण तपासासाठी महिला अधिकाऱ्याकडे सोपवा, नीलम गोऱ्हेंची मागणी

News Desk