HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या गैरहजेरीत कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. मात्र, शिवसेनेकडून कुणीही यावेळी उपस्थित नव्हतं, हे विशेष.

या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेकडून कोणीही उपस्थित नव्हतं. कोविंद फॉर्म भरतेवेळी शिवसेना सोडून एनडीएचे सगळे घटक पक्ष उपस्थित होते. मात्र कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेकडून अनंत गीते, संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ या तिघांच्या सह्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राजू शेट्टींसह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टिका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत,रोहित पवार

News Desk

सिंधुदुर्ग येथे उभे राहणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

News Desk

नव्या गाण्यासोबत मी पुन्हा येईन – अमृता फडणवीस 

News Desk