HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे किरीट सोमय्यांवर आरोप

मुंबई – महानगरपालिकेचे मुख्य हे आयुक्त असतात आणि त्यांची नेमणूक मुख्यमंत्री करतात , त्यामुळे

प्रस्ताव मंजूर करून अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीच्यावर आयुक्त आणि अर्बन डेव्हलपमेंट विभाग आहे. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे.या संपूर्ण कार्यप्रणालीचे मुख्य मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे घोटाळ्यासाठी कोण जबाबदार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे , असे प्रतिआव्हान खासदार शेवाळे यांनी खासदार सोमय्या यांना दिले आहे.

किरीट सोमय्या यांनी टँकर घोटाळ्याचा आरोप केला. मात्र त्यांच्याच मतदासरसंघात शिवाजी नगरमध्ये टँकरने पाणी पूर्वण्यासाठी सोमय्या यांच्या सह्यांचे पत्र आहेत. 150 रुपयांचे टँकर्स 700 ते 800 रुपयांना विकले असा आरोप शेवाळे यांनी केला. मुलुंड डंपिंग ग्राऊंडच्या बाजूला आकृती डेव्हलपर्स आणि बिल्डरला फायदा पोहचवण्यासाठी त्या डंपिंग ग्राउंड बंद करण्याची किरीट यांनी मागणी केली. जय श्रॉफ या कंत्राटदारावर किरीट सोमय्या यांनी कचरा घोटाळ्याचा आरोप केला, मात्र याच जय श्रोफसोबत कोल्ड प्ले कार्यक्रम केला. (मुख्यमंत्र्यांसोबत त्याचे फोटो खासदार शेवाळे यांनी पत्रकारांना दाखवले) संजय काकडे यांच्यावर सुद्धा घोटाळ्याचा आरोप असून भाजपने त्यांना पक्ष प्रवेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या उपास्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यांना राज्यसभेवर पाठवलं. देवनार व मुलुंड डंपिंग ग्राऊंडचे काम भाजप खासदार संजय काकडे यांच्याकडेच होते, असा आरोपही खासदार शेवाळे यांनी यावेळी केला.

रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांवर चार्जशीट दाखल झाल्या आहेत. मात्र त्यांचे कोट्यवधींचे पैसे अजून महापालिकेने वितरित केले नसल्याने घोटाळा झाला असा आरोप किरीट करत आहे , अशी टीका शेवाळे यांनी केली. कचरा घोटाळ्यातील आरोपीकडून भाजपच्या कार्यक्रमांना स्पॉन्सरशिप मिळाल्याचा आरोप करून मिठी नदी आणि माहुल गावातील अनधिकृत वांधकामाबाबत PIL किरीट सोमय्या यांनी दाखल केली मात्र त्याचं पिढी काय झालं कोणालाच माहिती नाही , असे शेवाळे यांनी सांगितले.

ACB ने सर्वात जास्त कारवाई भाजपच्या नगरसेवकांवर केलेली आहे राज्य सरकारच्या भाजपच्या ३० खात्यांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचा गंभीर आरोपही खासदार शेवाळे यांनी केला आहे.सीएम यांच्या गृह खात्यातही पारदर्शकता नाही. पारदर्शकता हा शब्द त्यांनी पहिल्यांदा बोलायला शिकावे

ब्लॅक पेपर काढणा-यांचेच तोंड काळे आहे.

आतापर्यंत किरीट सोमय्या हे माफियाराज संपावणार असं फक्त म्हणत होते मात्र माफिया कोण हे सांगत होते. आता आम्ही माफियांचे नाव सांगतो गृहखाते असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यांच्या वर कारवाई करावी. किरीट यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. हिम्मत असेल तर आम्ही सांगितलेल्या माफियांवर कारवाई करून दाखवावी , असे आव्हान शेवाळे यांनी भाजपला दिले .

मुंबईतील कंत्राटदारांचे नाव पुरोहित आणि शाह आहेत. या नावाचे लिक कुठल्या पक्षात आहेत आणि त्यांचे काय संबंध आहेत हे शोधून काढावं. हे सर्व कंत्राटदार एकाच राज्यातील, एकाच जिल्ह्यातील, एकाच तालुक्यातील आहेत. त्यांच्या गावापासून सरपंच ते आमदार – खासदार सर्व भाजपचे आहेत.पारदर्शकता बाबत आम्हाला बोलत आहात , पण पहिले पारर्दशकता शब्द बोलायला शिका , असा उपरोधिक टोला किरीट सोमय्या यांना लगावला .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! दोषींवर कारवाई होणार…

News Desk

दहा लाख रूपये घेऊन तिकीट कट -सोशल मीडियावर विडीओ वायरल

News Desk

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी उद्यापासून स्टार्टअप सप्ताह; मंगल प्रभात लोढा यांची माहिती

Aprna